Girija Oak : माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलगा… एका रात्रीत चर्चेत आलेल्या गिरिजा ओकचं धक्कादायक वक्तव्य

Girija Oak : माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलागा... रातोरात 'नॅशनल क्रश' ठरलेल्या गिरिजा ओकला सतावतीय कसली भीती, अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य सर्वत्र चर्चेत...

Girija Oak : माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलगा... एका रात्रीत चर्चेत आलेल्या गिरिजा ओकचं धक्कादायक वक्तव्य
गिरिजा ओक
| Updated on: Nov 15, 2025 | 11:25 AM

Girija Oak : अभिनेत्री गिरिजा ओक (Girija Oak ) सध्या तुफान चर्चेत आली आहे. निळ्या साडीमुळे गिरिजा रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिरिजा हिचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अचानक मिळणारं प्रेम पाहून गिरिजा हिने आनंद तर व्यक्त केलाच आहे, पण रातोरात प्रसिद्धी झोतात आल्यामुळे गिरिजा हिच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर गिरिजा हिचे एआई-मॉर्फ्ड फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. ज्यामुळे गिरिजा हिने चिंता व्यक्त केली आहे. शिवाय लोकांकडे विनंती देखील केली आहे.

अश्लील फोटो आणि व्हिडीओवर काय म्हणाली गिरिजा

अभिनेत्रीने एक्सवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली, ‘गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही सुरु आहे, त्यामुळे मी थोडी गोंधळलेली आहे… माझ्या प्रचंड प्रेम मिळत आहे.. लोकांचे फोन, मेसेज, डीएम, मिम्स पाहायला मिळत आहे.. काही प्रचंड मजेदार आहेत, तर काही प्रचंड अश्लील… माझे काही फोटो आणि व्हिडीओ एआई-मॉर्फ्ड केले आहेत… जे बिलकूल चांगले दिसत नाही… त्यामुळे मला त्रास होत आहे..’

 

 

गिरिजाची लोकांना विनंती…

गिरिजा स्वतःच्या मुलाचा उल्लेख करत म्हणाली, ‘माझा 12 वर्षांचा मुलगा आहे. तो सध्या सोशल मीडिया वापरत नाही.. पण, इंटरनेटवर अशा गोष्टी राहून जातात… जर उद्या माझ्या मुलाने माझे असे (Obscene Photo) फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले तर.. त्याला माहिती असेल की, ते माझे खरे फोटो नाहीत AI च्या माध्यमातून तयार केलेले आहेत…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला माझ्या मुलची काळजी वाटते… हे प्रचंड भयानक आहे… याबद्दल एकदा नक्की विचार करा आणि असे फोटो – व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु नका. क्लिक्स वाढवण्यासाठी असं काहीही करु नका…’ एवढंच नाही तर, यावेळी गिरिजा हिने असे फोटो आणि व्हिडीओ पाहणाऱ्यांना देखील दोषी ठरवलेलं आहे… सध्या अभिनेत्री गिरिजा ओक हिचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

गिरिजा ओक (Girija Oak Film) हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे… अभिनयाच्या जोरावर गिरिजा हिने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे… पण अचानक सोशल मीडियावर गिरिजा चर्चेत आली आहे. गिरिजा हिने फक्त मराठी नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.