AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Drugs Case | अर्जुन रामपालच्या बहिणीला पुन्हा NCB चे समन्स, चौकशीला हजेरी लावणार?

अभिनेता अर्जुन रामपाल याची बहीण कोमल रामपाल यांना NCB ने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.

Bollywood Drugs Case | अर्जुन रामपालच्या बहिणीला पुन्हा NCB चे समन्स, चौकशीला हजेरी लावणार?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 10, 2021 | 10:48 AM
Share

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याची बहीण कोमल रामपाल यांना (NCB Summoned Again To Arjun Rampal Sister) अंमलीपदार्थ विरोधी पथक अर्थात NCB ने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. कोमल रामपाल यांना उद्या चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स NCB ने बजावले आहेत. यापूर्वी 6 जानेवारीलाही कोमल रामपाल यांना NCB ने समन्स बजावले होते (NCB Summoned Again To Arjun Rampal Sister).

कोमल रामपाल NCB च्या चौकशी-तपासकार्यात असहकार्य करत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोमल रामपाल दोन दिवसांपूर्वी NCB कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणे अपेक्षित होतं. पण, त्या कारण न देताच गैरहजर राहिल्या होत्या.

कोमलवर अर्जुन रामपाल ड्रग्ज प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप

अर्जुन रामपाल ड्रग्ज प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप कोमल रामपालवर आहे. कोमल रामपाल चौकशीसाठी सहकार्य करीत नसल्याने या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया NCB ने सुरु केली आहे. तसेच, NCB ने पुन्हा एकदा कोमल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आता उद्या कोमल रामपाल चौकशीसाठी हजर राहणार की पुन्हा एकदा गैरहजर राहणार, हा प्रश्न आहे.

अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी

NCB कडून आतापर्यंत अभिनेता अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात NCB ने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी अर्जुन रामपालच्या घरी NCBच्या अधिकाऱ्यांना NDPC अॅक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधं मिळाली होती. अर्जुनने आपल्या एका नातेवाईकामार्फत बेकायदेशीरपणे ही औषधं घेतली होती. या औषधांसाठी ज्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला होता ते एक्सपायर झालं होतं.

अर्जुन रामपालने त्यावेळी सांगितलं होतं की, आपण NCBला एक विशेष औषधांचं प्रिस्क्रिप्शनही दिलं आहे. हे प्रिस्क्रिप्शन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने आपल्याला दिल्याचं त्याने म्हटलं होतं.

अर्जुन रामपालची तब्बल 6 तास चौकशी

21 डिसेंबररोजी अर्जुन रामपालची NCBकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सुमारे 6 तास चालली. त्या दिवशी त्याला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण चौकशीनंतर अर्जुनला सोडून देण्यात आलं. तत्पूर्वी NCBने त्याला 16 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण अर्जुनने 22 डिसेंबरला वेळ मागितली होती. पण 21 डिसेंबरला अचानक अर्जुन चौकशीसाठी आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

प्रकरण नेमके कुठून सुरू झाले?

1. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर हे प्रकरण सुरू झाले. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू झाला तेव्हा त्यात ड्रग्स अँगल समोर आला. ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने सर्व सुत्र हाती घेतले. एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी केली, त्यानंतर एकामागून एक अनेक खुलासे झाले. अनेक ड्रग पेडलर्स पकडले गेले.

2. त्याच्या तपासणीदरम्यान एनसीबीने नायजेरियन तरूणाला अटक केली. ओमेगा गोडविन असे याचे नाव होते. ओमेगाला एनसीबीने ड्रग्ससह अटक केली होती. पुढे चौकशी करत असताना अगिसियालोस डेमेट्रियड्सचे नाव ड्रग्जच्या प्रकरणात जोडले गेले.

3.अगिसियालोस अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाचा भाऊ आहे. अगिसियालोस लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या प्रोग्राममध्ये असताना त्याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने अगिसियालोसकडून चरस व अल्प्रझोलमच्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत (NCB Summoned Again To Arjun Rampal Sister).

4.एनसीबीने असा दावा केला होता की, अगिसियालोस ड्रग पेडलर्सशी संपर्क साधला होता. त्यांनी रिया चक्रवर्ती, शौविक, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्यासाठी ड्रग्स विकत घेतल्याचा आरोप केला होता.

5.अगिसियालोसच्या अटकेनंतर एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला. छापेमारी दरम्यान तपास अधिका्यांना अर्जुनच्या घरातून अशी काही ड्रग्ज सापडली, ज्यांची बंदी आहे आणि ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आहेत. यानंतर अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेमिका गॅब्रिएला यांना चौकशीचे समन्स पाठविण्यात आले.

6.16 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान अर्जुनने आपल्या घरातील प्रिस्क्रिप्शनची औषधे अधिकाऱ्यांना दिली होती. एनसीबीने दावा केला आहे की त्यांना हे प्रिस्क्रिप्शन खोटे आहे तसेच, अर्जुन रामपालने 16 नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीत तफावत दिसत आहे.

NCB Summoned Again To Arjun Rampal Sister

संबंधित बातम्या :

Drugs Case | 7 तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया!

Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयातून बाहेर, तब्बल 6 तास चौकशी!

Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल, 22 डिसेंबरच्या चौकशीपूर्वीच समन्स का बजावला?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा