अखेर ऐश्वर्या घटस्फोट घेणार? कोर्टात अर्ज दाखल, अनेक दिवसांपासून सुरु होत्या विभक्त होण्याच्या चर्चा, 4 वर्षांच्या…
इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.अनेक दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा होत्या, ज्या आता खऱ्या ठरल्या असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अभिनेत्याचा मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ आणि ऐश्वर्याची फसवणूक अशा अनेक चर्चा रंगल्या असून त्यांच्या नात्यातील दुरावा स्पष्ट झाल्याचं नेटकऱ्यांनीही म्हटलं होतं

इंडस्ट्रीमध्ये अचानक अशा घटना घडतात ज्यांच्याबद्दल नक्कीच आश्चर्य वाटतं. अशीच एक घटना घडली आहे ज्याबद्दल चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडी वेगळी होत आहे. त्यांनी घटस्फोटचा अर्ज दाखल केला आहे. या जोडीच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही काळापासून पसरत आहेत. आता मात्र या अफवा खरं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच कोर्टातही अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात आहे.
दोघांनी बऱ्याच काळापासून एकत्र फोटोही पोस्ट केले नाही
ही लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट. टीव्ही अभिनेता नील भट्टचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे त्यांच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून बातम्यांमध्ये आहेत . दोघांनी बऱ्याच काळापासून एकत्र कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केलेले नाहीत. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अभिनेत्याचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ व्हायरल
काहींनी असाही दावा केला आहे की हे दोन्ही कलाकार वेगळं होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने करवा चौथच्या दिवशी चंद्राचा फोटो शेअर केला होता, परंतु तिचा पतीसोबतचा फोटो पोस्ट केला नव्हता किंवा कुठेही त्याचे नावही नव्हते. तर त्याचदरम्यान अभिनेत्याचा एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा या खऱ्या असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा घटस्फोट घेत आहेत
बॉलिवूड असो वा टीव्ही, सर्व जोडपे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. तथापि, या खास प्रसंगी, एक जोडपे असे होते ज्यांनी एकत्र तो साजरा केला नाही. अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने इंस्टाग्रामवर तिची करवा चौथची पोस्ट तर शेअर केली पण त्यात कुठेही नीलचा उल्लेख नव्हता. तेव्हाही नेटकरी असा अंदाज लावत आहेत की ती नील भट्टपासून वेगळी होणार आहे. तसेच त्या मिस्ट्री गर्लमुळे नीलने पत्नी ऐश्वर्याची फसवणूक केल्याचा आरोपही सर्वजण करताना दिसत आहेत.
अभिनेत्रीचा प्रेमावरील विश्वास उडाला
नील भट्टसोबत घटस्फोटाच्या अफवांमध्ये, ऐश्वर्या शर्मा तिच्या बॉयफ्रेंडबद्दलही चर्चेत राहिली आहे. बिग बॉस 17 दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला की तिच्या बॉयफ्रेंडने विश्वासघात केल्यानंतर तिचा प्रेमावरील विश्वास उडाला होता. तथापि, नीलने तिला पुन्हा प्रेम करायला शिकवले. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा पहिल्यांदा “गुम है किसीके प्यार में” च्या सेटवर भेटले. या शो दरम्यान ते प्रेमात पडले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी 2021 मध्ये लग्न केले.
