शाहरूख, अजयच्या डोक्यावर नवं संकट, तुकाराम मुंढे मोठं पाऊल उचलणार, समाधानकारक उत्तर न दिल्यास…

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फसव्या जाहीराती आणि अतिरंजित दावे करणाऱ्या जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारांना देखील आपल्या कायद्याचा धाक दाखवला आहे. बॉलीवूड कलाकारांना यावर काय कारवाई होणार ? याकडे लक्ष लागले असताना तुकाराम मुंढे यांनी गंभीर वक्तव्य केले आहे.

शाहरूख, अजयच्या डोक्यावर नवं संकट, तुकाराम मुंढे मोठं पाऊल उचलणार, समाधानकारक उत्तर न दिल्यास...
ias tukaram mundhe news
| Updated on: Aug 18, 2026 | 10:44 PM

दहा रुपयांच्या विमलमध्ये भरभरुन केसर कसे लेका ? असे मीम्स आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘विमल पान’ मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफ या त्रयींना नोटिस बजावल्यानंतर सर्वत्र फिरत आहेत. या कलाकारांनी भ्रामक आणि फसव्या जाहिरातीत काम केल्याप्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याने तुकाराम मुंढे खूपच चर्चेत आले आहेत. तसेच आता या कलाकारांवर काय कारवाई होणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या संदर्भात आता एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा इशारा दिला आहे.

येथे पोस्ट वाचा-

पान मसाल्याच्या जाहिरातीत काम केल्याच्या प्रकरणात शाहरुख खान,अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटिस बजावण्यात आली आहे. या संदर्भात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पान मसाल्याच्या जाहीरात प्रकरणात कारवाईला थोडा उशीर झाल्याची कबुली दिली आहे. मात्र,तरी योग्य प्रकारची पावले उचलण्यात आली आहेत. या कायद्यात १ जुलै २०१९ रोजी बदल झाले आहेत. या अशा प्रकारच्या सरोगेट जाहिराती प्रकरणात त्यांच्यावर कारणे दाखवा नोटिसीवर त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांचे स्पष्टीकरण जर योग्य नसेल तर पुढील कारवाई होणार आहे. या कायद्यात १० लाख रुपायांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तरीही आमचे समाधान न झाल्यास प्रतिबंधित वस्तू संदर्भातील एफएसएसएआय (FSSAI) कायद्यातील सेक्शन ५९ अनसेफ फूड्स अंतर्गतही कारवाई होऊ शकते असेही मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us