Nimrat Kaur: दहशतवाद्यांनी बाबांचं अपहरण केलं अन्..; निम्रत कौरचा खुलासा, काळीज पिळवटून टाकणारी घटना

Nimrat Kaur: अभिनेत्री निम्रत कौरने तिच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटनेचा खुलासा केला आहे. ती अकरा वर्षांची असताना तिने वडील मेजर भूपेंदर सिंग यांना गमावलं होतं. ते भारतीय लष्कर अधिकारी होते.

Nimrat Kaur: दहशतवाद्यांनी बाबांचं अपहरण केलं अन्..; निम्रत कौरचा खुलासा, काळीज पिळवटून टाकणारी घटना
अभिनेत्री निम्रत कौर आणि तिचे वडील
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2026 | 9:59 AM

Nimrat Kaur: अभिनेत्री निमरत कौरने तिच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी आठवणींना उजाळा दिला आहे. निम्रत अवघी 11 वर्षांची असताना तिचे वडील मेजर भूपेंदर सिंह यांची काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. अनेक वर्षांनंतर या घटनेबद्दल बोलताना अभिनेत्रीने त्या काळातील भीषण अनुभव आणि आईने दोन्ही मुलींना सांभाळण्यासाठी दाखवलेल्या धैर्याची आठवण सांगितली. मेजर भूपेंदर सिंह हे भारतीय लष्करात अधिकारी होते. जानेवारी 1994 मध्ये काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. निम्रतने दिलेल्या माहितीनुसार, कामावरून परतत असताना काही जणांनी लष्करी जवानांचा वेश धारण करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दहशतवाद्यांकडून विविध मागण्या करण्यात आल्या.

या अपहरणानंतर तब्बल सात दिवस कुटुंबासाठी अनिश्चितता आणि चिंतेचं वातावरण होतं. अपहरणकर्त्यांनी भारतातील कैद्यांच्या सुटकेसह विविध मागण्या केल्या होत्या. मात्र सातव्या दिवशी कुटुंबाला मेजर भूपेंदर सिंह यांच्या हत्येची बातमी मिळाली. या घटनेची आठवण सांगताना निम्रतने तिच्या आयुष्यातील सर्वात असह्य क्षणाचा उल्लेख केला. ती म्हणाली, “त्यादिवशी सकाळी मी माझ्या वडिलांना नेहमीप्रमाणे कामावर जाताना पाहिलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना पाहण्याची वेळ आली ती त्यांच्या पार्थिवासमोर. या घटनेमुळे माझ्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या सावरता आलं नाही. वडिलांचा मृत्यू हा माझ्या आयुष्यात असा धक्का होता, ज्यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची मला कधी संधीच मिळाली नाही. अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही या घटनेची वेदना कायम आहे.”

Loading...

पहा फोटो-

वडिलांच्या निधनानंतर निम्रतच्या आईसमोर दोन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी होती. या कठीण परिस्थितीतही तिच्या आईने स्वतःला सावरलं आणि मुलींचं भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. निम्रतने पुढे सांगितलं, आईला पुढे जाण्याची ताकद तिच्या दोन मुलींमुळे मिळाली. कुटुंबीयांनीही त्या काळात मदत केली. वडिलांच्या निधनानंतर निम्रत, तिची आई आणि बहीण नंतर नोएडाला गेले, जिथे तिचे आजी-आजोबा राहत होते. मेजर भूपेंदर सिंह यांच्या बलिदानानंतर त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं. त्यांच्या आयुष्यातील ही घटना निम्रतच्या कुटुंबासाठी कायमची जखम ठरली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us