AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi: ठग सुकेश चंद्रशेखर फसणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीने दिला महत्त्वाचा जबाब

सुकेशने सुरुवातीला फक्त नोराला फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा तो त्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाला तेव्हा त्याने जॅकलिनवर हात आजमावला. एएनआयच्या रिपोर्टनुसार, जॅकलिन सुकेश चंद्रशेखर यांच्यावर इतकी प्रभावित झाली होती की तिने त्याच्याशी लग्न करण्याचा विचार केला.

Nora Fatehi: ठग सुकेश चंद्रशेखर फसणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीने  दिला महत्त्वाचा जबाब
Nora Fatehi,Image Credit source: Instagram
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 16, 2022 | 1:34 PM
Share

बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीची (Nora Fatehi) नुकतीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशी केली. तुरुंगात असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरशी असलेल्या तिच्या संबंधांवरून ही चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, नोरा फतेहीने अधिकार्‍यांसमोर दावा केला की मी कटकारस्थान रचणारी’ नसून ‘कटकारस्थानाची बळी’ पडली आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering cases)नोरा फतेहीची मंदिर मार्ग मुख्यालयात 6 तास चौकशी करण्यात आली. यासोबतच जॅकलिन आणि नोराची सुकेशशी ओळख करून देणाऱ्या पिंकी इराणीचीही EOW ने चौकशी केली.

धर्मादाय कार्यक्रमासाठी केला होता प्रवास

6 तासांच्या चौकशीदरम्यान नोरा फतेहीने पोलिसांना सांगितले की, या प्रकरणात ती ‘ सुकेशाच्या कटाची बळी ठरली आहे’. याशिवाय तिने सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉटही त्यांना दाखवले. त्यांनी तमिळनाडूमधील एका धर्मादाय कार्यक्रमासाठीच्या त्यांच्या प्रवासाची माहिती दिली आणि सांगितले की त्यांना एक्साइड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रवर्तक अधिकारी झैदी यांनी आमंत्रित केले होते आणि हा कार्यक्रम सुपर कार आर्टिस्ट्रीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

BMW 5 सिरीज कारचा आग्रहाचे वृत्त खोटे

जेव्हा नोराला विचारण्यात आले की तिचा प्रवास आणि इतर खर्च कोणी भरला. यावर त्याने लीना पॉलचे नाव घेतले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिने BMW 5 सिरीज कारचा आग्रह धरल्याचेही नोराने स्पष्टपणे नाकारले. अभिनेत्रीने सांगितले की ही कार तिला “प्रेम आणि जनेरोसिटी साईन ” म्हणून भेट दिली गेली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे तिने सुरुवातीलाही भेट नाकारली होती. सुकेशने सुरुवातीला फक्त नोराला फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा तो त्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाला तेव्हा त्याने जॅकलिनवर हात आजमावला. एएनआयच्या रिपोर्टनुसार, जॅकलिन सुकेश चंद्रशेखर यांच्यावर इतकी प्रभावित झाली होती की तिने त्याच्याशी लग्न करण्याचा विचार केला.

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...