Nushrratt Bharuccha : दुखापतीनंतर यशस्वी ऑपरेशन, नुसरत भरूचाला डिस्चार्ज; हेल्थ अपडेट समोर

स्पाइन सर्जरीनंतर नुसरत भरुचा घरी आली आहे. गुरूवारी तिला ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण तिच्या रिकव्हरीसाठी किती वेळ लागणार, टीमने काय सांगितलं ?

Nushrratt Bharuccha : दुखापतीनंतर यशस्वी ऑपरेशन, नुसरत भरूचाला डिस्चार्ज; हेल्थ अपडेट समोर
| Updated on: Oct 15, 2026 | 9:41 PM

Nushrratt Bharuccha Discharged : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) हिला मध्यंतरी गंभीर दुखापत झाली होती. परदेशात असताना ती जखमी झाली, भारताता आल्यावर तिची स्पाईन सर्जरी यशस्वी झाली. आता तिला रुग्णालयतातून डिस्चार्ज मिळाला असूनती घरीदेखील परतली आहे. तिचं ऑपरेशन यशस्वी झालं असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं नुसरतच्या टीमने सांगितलं आहे. काही दिवसांपूरवी नुसरतचा अपघाता झाला होता, त्याच तिच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर एअर अँब्युलन्सद्वारे नुसरतला मुंबईत आणण्यात आलं होतं.

या अपघातानंतर नुसरत भरूचा हिला बाली येथील एका रुग्णालयात दाखल करून तिथे सुरूवातीला उपचार करण्यात आले. मात्र तिच्या दुखापतीची गंभीरता लक्षात घेऊन नंतर तिला मुंबईत हलवण्यात आलं आणि ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईत आल्यावर नुसरतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यात ती स्ट्रेचवर झोपलेली दिसत होती. त्यानंतर जवळपास 2 आठवडे नुसरत ही ब्रीच कँडी रुग्णालायत होती. अखेर तिला आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही तिला पूर्णपणे बरं वाटण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो, असं तिच्या टीमने सांगितलं.

Loading...

 

ब्रीच कँडीमध्ये यशस्वी ऑपरेशन

नुसरतच्या टीमने तिच्या ऑपरेशनबद्दल माहिती दिली. ” अपघातानंतरच्या अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्यावर करण्यात आलेली मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ती आता घरी परतली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या सहवासात तिची प्रकृती सुधारत आहे” असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.

” नुसरत हिला पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी काही काळ लागणार असला, तरी ती सकारात्मक आहे. सध्या ती तिची प्रकृती सुधारण्यावर आणि पुन्हा शारीरिक ताकद मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तिच्या या रिकव्हरीच्या प्रवासात आप्तस्वकीयांची साथ आणि काळजी हा मोठा आधार ठरत आहे मोठा आधार देत आहे”, असं निवेदनात पुढे म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us