AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaj Panchariya : 9 समलिंगी लोकांनी स्वतःला संपवलेलं मी पाहिलंय…प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, काय घडलं?

Pankaj Panchariya Post : अभिनेता पंकज पंचारियानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Pankaj Panchariya : 9 समलिंगी लोकांनी स्वतःला संपवलेलं मी पाहिलंय...प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, काय घडलं?
| Updated on: Oct 25, 2026 | 3:01 PM
Share

अभिनेता पंकज पंचारिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि सामाजिक विषयांवर भाष्य करतो. अशातच आता अभिनेत्यानं केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघरनं एका पॉडकास्टला मुलाखत दिलेली. या मुलाखतीवरून अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर आता पंकजनं पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्यानं समलिंगत्वाबद्दल भाष्य केलं आहे.

पंकज पंचारियाची पोस्ट

पंकज पंचारियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘पुरुषी संस्कृतीचं उदात्तीकरण करणारे आपण! पण जेव्हा या पुरुषी संस्कृतीच्या उदात्तीकरणाचा अतिरेक होतो, त्यावेळी आपण काँग्रेस आणि भाजप करत बसायचं का? खालील पोस्टमध्ये सचिनभाऊ असे म्हणत आहेत की, ‘प्राजक्त, तू हिजडा आहे.’ बरं, त्यातल्या व्याकरणाच्या चुकांवर आपण सध्या बोलणे टाळूया. प्राजक्ता ज्या विचारधारेतून येते, तो तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे; पण म्हणून तिच्याबद्दल अशी भाषा वापरणं खरंच योग्य आहे का?’

‘दुर्दैवी समाज कदाचित वाचत नाही किंवा हुशार नसेल. पण ‘हिजडा’ हा शब्द अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘हिजराह’ म्हणजे ‘हिज’ (वेगळ्या) आणि ‘राह’ (वाटेने/रस्त्याने) – म्हणजेच वेगळ्या वाटेने प्रवास करणाऱ्याला ‘हिजराह’ म्हटले जात होते. अजून एक माहिती देतो, महाभारतात शिखंडी हा जगातला पहिला किन्नर राजा होऊन गेला. पण माझे सचिनभाऊ वाचत नाहीत किंवा त्यांच्या मेंदूला कदाचित खरंच ‘गु’ लागला असेल का? पण असो, शेवटी आपला भाऊ आहे, त्याला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या रागासाठी, सचिनभाऊ, तुम्ही कोणत्याही सेक्स कम्युनिटीला (लिंगभावात्मक समुदायाला) शिवी म्हणून वापरू शकत नाही; कारण सीमा आनंद (सेक्स थेरपिस्ट) असे म्हणतात की, जगातला प्रत्येक पुरुष हा उभयलिंगी (Bisexual) असू शकतो.’

‘आता भाऊ, जरा अजून काही गप्पा मारूया! तू म्हणाला की, ‘ही समलिंगी आहे.’ अरे सचिनभाऊ, समलिंगी ही शिवी नाही होऊ शकत! ती एक सेक्स कंडिशन (लैंगिक स्थिती) आहे. कंडिशनला शिवी बनवता येत नाही, मित्रा. आता तू अभ्यासात हुशार नाही, म्हणून मी तुला प्रेमानं ‘दगड’ किंवा सुकलेला ‘गु’ म्हटलं, पण तू हुशार नाही म्हणून मी तुझा राग करून तुला समलिंगी का म्हणून? आता अजंठा-वेरूळला तुझ्या शाळेची सहल गेली असेलच, तिकडे अनेक लेण्यांमध्ये तुला समलिंगी शिल्पेही दिसतील. बघ मित्रा, जरा अभ्यास केला की किती मस्त बोलता येते!’

L – Lesbian (लेस्बियन)

G – Gay (समलिंगी पुरुष)

B – Bisexual (उ उभयलिंगी)

T – Transgender (ट्रान्सजेंडर – महिला/पुरुष)

Q – Queer (१८०० च्या दशकात ‘क्विअर’ म्हणजे वेगळे, असा पाश्चात्य देशांत शब्द वापरला जात होता. तो शब्द पूर्वी अपमानास्पद होता, पण समुदायानं त्याला सन्मानाचा दर्जा देऊन LGBTQ+ मध्ये समाविष्ट करून घेतला.)

A – Asexuality (यामध्ये व्यक्तीला कोणत्याही लैंगिक भावना निर्माण होत नाहीत. म्हणून भाऊ, ती व्यक्ती आजारी नसते, तर ती सुद्धा एक नैसर्गिक भावना आहे.)

I – Intersex (याचा अर्थ, त्या व्यक्तीचे लिंग अस्पष्ट असते म्हणजेच ती पूर्णपणे स्त्री किंवा पुरुष नसते. अशा व्यक्ती जगात दोन लाखांमागे एक जन्मतात.)

मला शाळेत सेक्स एज्युकेशन शिकवले नाही, पण जगात खूप अभ्यास करता येऊ शकतो, हा विश्वास माझ्या मनात कायम आहे. म्हणून मी सविस्तर लिहून तुला उत्तर दिले. तुला शिवी देऊन मी माझा प्रवास ‘ढत्वाकडे’ कशामळे नेऊ? प्राजक्ता ही माझी चांगली मैत्रीण आहे, पण विचारांच्या खिडकीतून आमचे विचार नक्कीच वेगळे आहेत. म्हणून तिला चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नकोस.’

‘समलिंगी असणं हा गुन्हा नाही. विरुद्ध लिंगी असणे ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. जर विरुद्ध लिंगी लोकच महान असते, तर बाबा बंगालीकडे गुपचुप जाऊन लिंग ताठरण्याच्या गोळ्या लोक कशाला घ्यायला गेले असते आणि बाबा बंगाली तुमचे नाव का गुप्त ठेवत असेल? सचिनभाऊंसारख्या लोकांमुळे लॉकडाऊनमध्ये ९ समलिंगी लोकांच्या आत्महत्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. सारंग पुणेकर (भारतातली पहिली ट्रान्सजेंडर् जिने पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले) सारखी मैत्रीण सुद्धा आत्महत्येने गेलेली मी पाहिली आहे. मित्रा, असे नका वागू! अक्कल असेल तर समानतेने जगा आणि जगू द्या.

टीप :- मला कोणत्याची राजकीय विचारांशी काही घेणे देणे नाही… लैंगिक समानता असावी इतकी साधी अपेक्षा आहे…’ असं पंकजनं शेवटी म्हटलं आहे.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी