हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कॅसेटच्या दुकानाबाहेर केलेली प्रचंड गर्दी, आजही ती गाणी प्रचंड सुपरहिट

1996 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कॅसेटच्या दुकांनामध्ये केली होती प्रचंड गर्दी. बाहेर लागल्या होत्या लोकांच्या रांगा. चित्रपटातील गाणी ठरलेली प्रचंड सुपरहिट.

हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कॅसेटच्या दुकानाबाहेर केलेली प्रचंड गर्दी, आजही ती गाणी प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 17, 2026 | 6:38 PM

बॉलिवूडमधील 90 च्या दशकाचा काळ संगीतप्रेमींसाठी खास होता. त्या काळात मोबाईल किंवा म्युझिक ॲप्स नसल्यामुळे लोक गाण्यांच्या कॅसेट खरेदी करून आवडती गाणी ऐकायचे. याच काळात प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटाने आपल्या कथेसोबतच दमदार संगीतामुळेही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’ हा चित्रपट 13 जानेवारी 1995 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी राजेश रोशन यांनी सांभाळली होती. अल्बममध्ये एकूण सात ओरिजिनल गाणी होती. यामध्ये ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’, ‘जाती हूं मैं’, ‘जय मां काली’, ‘गुप चुप गुप चुप’, ‘भांगड़ा पाले’, ‘एक मुंडा’ आणि ‘ये बंधन तो’ या गाण्यांच्या समावेश होता.

कुमार सानू, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजाची जादू

‘ये बंधन तो प्यार का बंधन है’ हे गाणं आजही चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांमध्ये गणलं जातं. कुमार सानू, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी या गाण्याला आवाज दिला होता. तर ‘जाती हूं मैं’ या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांची जोडी ऐकायला मिळाली.

या गाण्यांमध्ये 90 च्या दशकातील संगीताची मधुरता, सोपे शब्द आणि लक्षात राहणाऱ्या चालींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक वर्षांनंतरही ही गाणी प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातात.

बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने केली दमदार कमाई

‘करण अर्जुन’मध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांनी करण आणि अर्जुन या भावांची भूमिका साकारली होती. याशिवाय राखी, काजोल, ममता कुलकर्णी आणि अमरीश पुरी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

पुनर्जन्म आणि बदला या विषयाभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. Box Office India नुसार, चित्रपटाचं बजेट सुमारे 6 कोटी रुपये होतं, तर भारतातील नेट कलेक्शन सुमारे 25.28 कोटी रुपये झालं. चित्रपटाच्या वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शनचा आकडा सुमारे 43.63 कोटी रुपये असल्याचं नमूद केलं जातं. ‘करण अर्जुन’ची कथा, कलाकारांचा दमदार अभिनय आणि अविस्मरणीय संगीत यामुळे हा चित्रपट 90 च्या दशकातील चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us