Polka dot style : पुन्हा परतली पोल्का डॉट स्टाईल, पाहा भूमी पेडणेकरचा रेट्रो लूक

तुम्हालाही पोल्का डॉट ड्रेस ट्राय करायचा असेल तर या अभिनेत्रींना तुम्ही फॉलो करू शकता.(Polka dot style, see Bhumi Pednekar's retro look)

Polka dot style : पुन्हा परतली पोल्का डॉट स्टाईल, पाहा भूमी पेडणेकरचा रेट्रो लूक

मुंबई : फॅशनच्या बाबतीत मुली बॉलिवूड कलाकारांना फॉलो करतात. नवीन वर्षात, पोल्का डॉट ड्रेसची फॅशन पुन्हा एकदा परत आली आहे. यापूर्वीदेखील अनन्या पांडेपासून सारा अली खान आणि कियारा ते प्रियांका चोप्रापर्यंत या सगळ्यांनीच पोल्का डॉट स्टाईल फॉलो केली आहे. हा रेट्रो लूक दरवर्षीच ट्रेंडमध्ये असतो. या वेळी अभिनेत्री भूमी पेडणेकरनं या ट्रेंडला पुन्हा सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanya Ghavri (@tanghavri)

तुम्हालाही पोल्का डॉट ड्रेस ट्राय करायचा असेल तर या अभिनेत्रींना तुम्ही फॉलो करू शकता. या पोल्का डॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर ग्लॅमरस दिसत होती, तुम्हीही ही स्टईल ट्राय करू शकता.

भूमी पेडणेकर

भूमीनं पोल्का डॉट टॉप आणि व्हाइट बॉटम पॅन्ट कॅरी केलं आहे. या ड्रेसमध्ये भूमीची स्टाईल स्टनिंग दिसत आहे. तिचे हे फोटो स्टायलिस्ट तान्या घावरी यांनी पोस्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

अनन्या पांडे

अनन्या पांडे सध्या तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. मग ती बिकिनी असो वा बॉडी कॉन ड्रेस. प्रत्येक ड्रेसिंग स्टाईलमध्ये ती सुंदर दिसते. आता तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पांढरा पोल्का क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट तिनं या फोटोमध्ये घातला आहे.तुम्हीसुद्धा अनन्याचा हा लूक ट्राय करू शकता.

सोनम कपूर

बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमी ओळखली जाते. या अभिनेत्रीनं पांढऱ्या पोल्का डॉट टॉपसोबत हाय-वेस्ट ब्लॅक पँट परिधान केला होता. ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुलींसाठी सोनमचा हा अंदाज उपयोगी ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)