AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Birari : माझी सासू खूपच स्ट्रिक्ट, मी फक्त शांत…पूजा बिरारीने सांगितलं सासू सुचित्रा बांदेकरांचं गुपित, सासू-सूनेचं नातं नेमकं कसं?

Pooja Birari : पूजा बिरारीनं नुकत्याच एका मुलाखतीत सासू सुचित्रा बांदेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं असून याच मुलाखतीत अभिनेत्रीनं सासूसोबतच्या बॉण्डिंगबद्दलही भाष्य केलं आहे.

Pooja Birari : माझी सासू खूपच स्ट्रिक्ट, मी फक्त शांत...पूजा बिरारीने सांगितलं सासू सुचित्रा बांदेकरांचं गुपित, सासू-सूनेचं नातं नेमकं कसं?
| Updated on: Oct 01, 2026 | 7:17 PM
Share

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा बिरारीनं काही महिन्यांपूर्वी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहमी बांदेकरसोबत लग्नगाठ बांधली. अनेक मुलाखतींमध्ये पूजानं सासू–सासऱ्यांबद्दल भाष्य केलं आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत पूजानं सुचित्रा बांदेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. पूजा म्हणाली की, तिला सुरुवातीला सुचित्रा यांची भीती वाटायची.

सासूबद्दल काय म्हणाली पूजा बिरारी?

इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांच्याबद्दल बोलताना पूजा बिरारी म्हणाली की, ‘आईंच्या बाबतीत सुरुवातीला थोडी आदरयुक्त भीती होती. सोहमने मला सांगितलंच नव्हतं की, आईला भेटायचं आहे. त्यांना असं सरप्राइजिंगली भेटणं म्हणजे माझ्या पोटात गोळा आला होता. बाकी त्या गोडच आहेत. मी त्यांना स्क्रीनवर पाहिलेलं. पण घरी गेल्यावर त्यांनी एका वाक्यात मला शांत केलं. त्या मला म्हणाल्या की, मला कळतंय तुला समजत नाहीये काय रिअॅक्ट व्हायचं. मलाही कळत नाहीये. त्यामुळे आपण एकाच नावेच्या प्रवासी आहोत. तेव्हाही त्यांनी मला एक गिफ्ट दिलेलं.’

‘त्यांनी मला तेव्हाच सांगून टाकलं होतं की, हे बघ मला मुलगी नाहीये आणि मला खूप हौस आहे मुलीचं सगळं करायची. त्यामुळे मी गिफ्ट दिल्यावर नाही म्हणालीस तर बघ. आता आमच्यात खूप कम्फर्ट आहे. आता ती भीती नाहिये. आईंबद्दल बऱ्याच लोकांना भीती आहे. ती असायलाच हवी. आपल्याला पण सासू म्हटलं की, खूप काही सांगून ठेवलेलं असतं. सगळे मला म्हणतात, माझी सासू खूप स्ट्रिक्ट आहे, मी शांतपणे सगळं ऐकते. पण आमची मज्जा सुरू असते.’ असं पूजा शेवटी म्हणाली.

दरम्यान, पूजा बिरारीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘स्वाभिमान‘ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेनं अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर पूजा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं‘ या मालिकेत दिसली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती