रामायण मालिकेतील ‘लक्ष्मणा’च्या मुलाचा टीव्ही अभिनेत्रीसोबत निकाह, व्हिडिओनं वेधलं लक्ष

सारा खान आणि कृष पाठक यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या खास निमित्ताने साराने त्यांच्या निकाहाचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

रामायण मालिकेतील लक्ष्मणाच्या मुलाचा टीव्ही अभिनेत्रीसोबत निकाह, व्हिडिओनं वेधलं लक्ष
Sara Khan wedding anniversary
Image Credit source: social media
| Updated on: Oct 02, 2026 | 11:36 PM

बिदाई मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खान हिच्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे. कारण, आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. साराने २ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा बॉयफ्रेंड कृष पाठकसोबत लग्नगाठ बांधली होती. आज पहिल्या ॲनिव्हर्सरीला साराने तिच्या निकाहचा एक खूप गोड आणि याआधी कुठेही शेअर न झालेला व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सारा आणि कृष यांनी आधी स्पेशल मॅरेज ॲक्टखाली कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीने एकदम थाटात लग्न केलं. २ ऑक्टोबरला लग्न झालं असलं, तरी ८ ऑक्टोबरला त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. साराने शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओमध्ये निकाहचे सुंदर क्षण दिसतायत. कृष पांढऱ्या शेरवानीमध्ये हँडसम दिसतोय, तर सारानेही मॅचिंग लेहेंगा घातलाय. या व्हिडीओत दोघे एकमेकांना अंगठी आणि हार घालताना दिसतायत.

Loading...

 

 

 

दरम्यान, साराने केलेलं हे तिचं दुसरं लग्न आहे. याआधी तिने बिग बॉस ४ मध्ये अली मर्चंटसोबत सर्वांसमोर लग्न केलं होतं, पण ते काही महिन्यांतच मोडलं हों. त्यानंतर कृष तिच्या आयुष्यात आला. एवढच नाही तर सारा कृषपेक्षा वयाने मोठीदेखील आहे, पण प्रेमाला वयाचं कोणतंही बंधन नसतं म्हणणतात ना हेच त्यांनी दाखवून दिलं. जवळपास एक वर्ष डेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

या लग्नातली सर्वांत वेगळी गोष्ट म्हणजे, कृष हा रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा आहे. पण या लग्नात सुनील लहरी कुठेच दिसले नाहीत. कृष अवघा ९ महिन्यांचा असतानाच सुनील लहरी आणि त्याच्या आईचा भारती पाठक यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर कृषला त्याच्या आईनेच एकटीने मोठं केलं. म्हणूनच कृष वडिलांचं नाव न लावता त्याच्या आईचं पाठक हे आडनाव त्याच्या नावापुढे लावतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us