Prajakta Mali : ‘हा’ मराठी अभिनेता होता प्राजक्ता माळीचा क्रश, म्हणालेली, एकत्र काम केल्यामुळे…
Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं एका जुन्या मुलाखतीत तिच्या मराठी इंडस्ट्रीतील क्रशबद्दल सांगितलेलं.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीला एका मुलाखतीदरम्यान तिच्या क्रशबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर अभिनेत्रीनं दाक्षिणात्य सुपरस्टारसोबतच मराठी अभिनेत्याचंही नाव घेतलेलं. प्राजक्ता माळी म्हणालेली की, ‘माझा सिनेसृष्टीतील नानी नावाचा सुपरस्टार क्रश आहे. खरतंर क्रश तुम्हाला कधीही भेटाला नाही पाहिजे. नाहीतर मग हा पण तसाच आहे, असं आपलं होतं.’
काय म्हणालेली प्राजक्ता माळी?
मराठी इंडस्ट्रीतील क्रशबद्दल विचारलं असता प्राजक्ता म्हणालेली की, ‘मराठी सिनेसृष्टीतील क्रशबद्दल बोलायचं तर अभिनेता वैभव तत्त्ववादी हा माझा एकेकाळी क्रश होता. मी एकदा आईला हा तुला जावई म्हणून चालेल का, असं देखील विचारलं होतं. ‘कॉफी आणि बरंच काही’ नंतर तो माझा क्रश होता. पण आता त्याच्याबरोबर लंडनमध्ये मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. त्यावेळी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. मी त्याला शूटिंगदरम्यान कधीच याबद्दल सांगितलं नाही. पण एकत्र काम केल्यामुळे आता त्याच्यावर तसा क्रश राहिलेला नाही. क्रश हे तुम्हाला भेटले नाही पाहिजेत, तरच ते तुमचे क्रश राहतात.’ ‘प्लॅनेट मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळी बोलत होती.
पुढे याबद्दल वैभव तत्त्ववादीलाही विचारण्यात आलेलं. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत वैभव म्हणालेला की, ‘तुम्ही तो व्हिडिओ नीट पाहिला नाही, असं वाटतंय मला. त्यात ती म्हणालीये की, ‘कॉफी आणि बरंच काही’ रिलीज झाल्यानंतर मी आईला म्हटलेलं, आई तुला हा चालेल का जावई म्हणून. ती ना माझ्याकडे कधी बातमी आली, ना तिची आई माझ्याकडे आली, असं काहीच झालं नाही.’
View this post on Instagram
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिला ‘जुळून येती रेशीमगाठी‘ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीनं निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं. त्याचबरोबर प्राजक्ताचा ज्वेलरी ब्रँडसुद्धा आहे.
