Pranit More: ‘फक्त प्रसिद्धी – पैसे कमवण्यासाठी…’, 370 ची बिर्याणी वादानंतर सर्वांसमोर रडला प्रणित मोरे, व्हिडीओ समोर
Pranit More: 370 ची बिर्याणी प्रकरणानंतर कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. झालेल्या प्रकरणानंतर प्रणित याने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर प्रणित याचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रणित सर्वांसमोर रडला...

Pranit More: लोकप्रिय कॉमेडियन प्रणित मोरे तेव्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला, जेव्हा शोमध्ये एका प्रेक्षकाने महिलांविराधोत आपत्तिजनक वक्तव्य केलं. प्रेक्षक हिमांशू याने दावा केलेला की, ‘डेटवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात त्याला शारीरिक संबंधांची अपेक्षा होती… ‘, तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजलेली. एवढंच नाही तर, प्रणित याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांची माफी देखील मागितली. घडलेल्या त्या प्रकरणानंतर प्रणित याने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. सध्या प्रणित याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रणित भावूक देखील झाला.
370 ची बिर्याणी प्रकरणानंतर कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा लाईव्ह शो करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शोमध्ये आलेल्या प्रेक्षकांचे प्रणित याने आभार मानले. ‘मी स्टेजवर आलो तेव्हा मला वाटलं की, लोकं मला स्वीकारतील की नाही… पण मला खूप चांगलं वाटत आहे… सर्वांना माझं समर्थन केलं.. विशेषतः जे काही झालं त्यानंतर… मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो…’
This Clip Is from his Georgia Show (14th June)#PranitMore pic.twitter.com/NtTHGUhkB0
— Supreme (@DarshanShi67146) July 30, 2026
पुढे प्रणित म्हणाला, ‘त्यानंतर खूप काही झालं… मी स्पष्ट सांगतो, मी प्रसिद्धीसाठी आणि पैसे कमावण्यासाठी शोची सुरुवात केली नाही. मी माझी जुनी नोकरी सोडली आणि स्टँड – अप करण्यास सुरुवात केली… कारण त्यातून मला आनंद मिळत होता. दुसऱ्यांना आनंदी ठेवणं हाच माझा कायम हेतू राहिला आहे… त्यामुळे, जेव्हा असं काही होतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं…’
‘माझ्या आईने मला सांगितलं, तुझ्याकडून चूक झाली आणि तू माफी देखील मागितली.. यावर मी आईला म्हणालो, ‘त्यांना पुन्हा आवडलं नाही तर…’, आई म्हणाली, ‘चुका सर्वांकडून होतात. तुमच्याकडून कधी कोणती चूक झाली नाही का? माझ्याकडून चूक झाली आणि पुन्हा असं होणार नाही… याची मी काळजी घेईल… मी अनेक शो केले आहेत. पण हा शो कायम माझ्या लक्षात राहील…’, असं देखील प्रणित मोरे भावूक होत म्हणाला.