AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prasad Oak : आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती तुम्ही असता तर…प्रसाद ओकची आनंद दिघेंना आर्त हाक

Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच एका कार्यक्रमात आनंद दिघे यांच्याबद्दल भाष्य केलं असून अभिनेता भावुक झाला होता.

Prasad Oak : आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती तुम्ही असता तर...प्रसाद ओकची आनंद दिघेंना आर्त हाक
| Updated on: Oct 18, 2026 | 3:29 PM
Share

मराठी अभिनेता प्रसाद ओकनं ‘धर्मवीर‘ आणि ‘धर्मवीर 2′ सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारलेली. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमासाठी प्रसादला अनेक पुरस्कारही मिळाले. अशातच आता रत्नागिरीतील एका कार्यक्रमात प्रसाद ओकनं आनंद दिघे यांना काल्पनिक फोन लावत भावनिक साद घातली. प्रसाद ओक म्हणाला की, ‘दिघे साहेब, जय महाराष्ट्र. माझं दुर्दैव की, मी तुम्हाला प्रत्यक्षात कधीही पाहिलं नाही, कधीही भेटलो नाही. तुमचा सहवास मला कधीच लाभला नाही.’

प्रसाद ओकची भावनिक साद

‘दोन प्रसंगात तुमचं नाव ऐकलं आणि प्रचंड मोठं नाव ऐकलं. एक प्रसंग म्हणजे, नथुराम गोडसे नाटक बंद पाडलं होतं, ते तुमच्यामुळे सुरू झालं. आणि ‘यदा कदाचित‘ हे नाटक बंद पाडलं, तेही तुमच्यामुळे सुरू झालं. त्यामुळे कलेच्या रक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही पक्ष, राजकीय विचार बाजूला ठेऊन कलाकारांच्या पाठीशी उभे राहता, याने मी भारावून गेलो. आणि आयुष्यात कधीतरी पुढे जाऊन ती भूमिका मला करायला मिळेल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तुमची भूमिका करताना, तुमचे शिष्य, तुमचे अनुयायी यांची मला प्रचंड मदत झाली. मी तुमची भूमिका करतोय म्हटल्यावर नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कुठून–कुठून येऊन लोक मला भेटायचे आणि मला तुमच्याबद्दल सांगायचे. या सगळ्याचा मला खूप फायदा झाला.’

‘आज ‘धर्मवीर 1′, ‘धर्मवीर 2′ या दोन्ही सिनेमांना जे यश मिळालं, जे माझ्या भूमिकेला यश मिळालं, हे सगळं तुमच्या आशिर्वादाशिवाय केवळ अशक्य होतं. तुम्ही सतत आमच्या आसपास होतात, राहिलात आणि त्यामुळेच आम्ही हे सिनेमे यशस्वी करू शकलो. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एकच सांगतो, आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती तुम्ही असता तर 100 टक्के नसती. तुम्ही परत आलात तर महाराष्ट्र वाचेल, प्लिज परत या.’ असं प्रसाद ओक शेवटी म्हणाला.

Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?