AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pratyusha Banerjee : बालिका वधूमधील ‘नंदिनी’ने जग सोडण्यामागे बॉयफ्रेंडचा हात? प्रत्युषा बॅनर्जी केसमध्ये कोर्टाचा सर्वात मोठा निकाल!

Pratyusha Banerjee Case : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं 10 वर्षांपूर्वी टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली. अशातच आता याप्रकरणी न्यायालयानं निकाल जाहीर केला आहे.

Pratyusha Banerjee : बालिका वधूमधील 'नंदिनी'ने जग सोडण्यामागे बॉयफ्रेंडचा हात? प्रत्युषा बॅनर्जी केसमध्ये कोर्टाचा सर्वात मोठा निकाल!
| Updated on: Sep 30, 2026 | 6:50 PM
Share

मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणातील आरोपी राहुल राज सिंग याला निर्दोष मुक्त करून मोठा दिलासा दिला. प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप राहुलवर होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे प्रत्युषा घराघरात पोहोचली होती.

न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या खंडपीठानं १ एप्रिल २०१६ रोजी गळफास घेण्यापूर्वी प्रत्युषा आणि राहुल यांच्यातील शेवटचं संभाषण महत्त्वपूर्ण पुरावा मानलं. या संभाषणाच्या आधारे, न्यायालयाने जवळपास 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात राहुलला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केलं आहे.

१० वर्षांनंतर मोठा निर्णय

२४ वर्षीय प्रत्युषा तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यावेळी ती तिचा अभिनेता-निर्माता राहुल राज सिंग याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आत्महत्येनंतर राहुलनं प्रत्युषाला रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

प्रत्युषाच्या आईवडिलांनी राहुलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की, राहुलने प्रत्युषाचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला आणि त्याच्या छळामुळेच अभिनेत्रीनं आत्महत्या केली. यानंतर, राहुलविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, हल्ला करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला.

यापूर्वी, दिंडोशी सत्र न्यायालयानं राहुलची दोषमुक्तीची याचिका फेटाळली होती आणि त्याच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते. सत्र न्यायालयानं म्हटलं होतं की, या प्रकरणात मानवी वर्तन आणि मानसिक स्थितीचं सखोल विश्लेषण करणं आवश्यक आहे.

राहुलचे प्रतिनिधित्व करणारे वकील, आबाद पोंडा आणि श्रेयांश मिठार यांनी युक्तिवाद केला की, राहुलचे प्रत्युषासोबतचे शेवटचे संभाषण स्पष्टपणे दर्शवतं की, तो तिला आत्महत्या करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं म्हटलं होतं की, तो आपली गाडी वळवून तिला भेटायला येत आहे. पण, हे आपलं शेवटचं बोलणं असेल, असं प्रत्युषा म्हणालेली. दरम्यान, प्रत्युषानं तिच्या आईवडिलांसह सर्वांना दोष दिला. प्रत्युषा आणि राहुल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या शेवटच्या संभाषणाच्या आधारावर, मुंबई उच्च न्यायालयानं २०१६ मध्ये राहुलला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Follow Us
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?