Prem Kitanu Movie Review: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा ‘प्रेम किटाणू’ सिनेमा प्रदर्शित, काय आहे सिनेमाची कथा
Prem Kitanu Movie Review: ‘प्रेम कीटाणु’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात माजी मुख्यमंत्र्यांचा नातू दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

सिनेमागृहांमध्ये वीर पहारियाचा कॉमेडी सिनेमा ‘प्रेम कीटाणु’ रिलीज झाला आहे. कॉलेज लाइफवर आधारित या चित्रपटात प्रेम, मैत्री, कुटुंब आणि हलक्याफुलक्या कॉमेडीचा तडका आहे. चित्रपटात वीर पहारियासोबत आफिया सैयद आणि अपारशक्ती खुराणाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपट कसा आहे? त्याच्या कथेत काय खास आहे आणि कलाकारांचा अभिनय कसा आहे? चला जाणून घेऊया…
बनारसच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन दरम्यान विशाल (वीर पहारिया) आणि सुहानी (आफिया सैयद) पहिल्यांदा भेटतात. दोघे एकमेकांना चार वर्षे सिंगल राहण्याचा शाप देतात. शिक्षणानंतर दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदललेले असते. सुहानी एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरी मिळवून आपल्या करिअरमध्ये स्थिरावते. तर कॉलेजच्या दिवसांत दिल तुटल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे विशाल आयुष्यात मागे पडतो. विशाल आता अमेरिकेला जाऊन पुढील शिक्षण घेऊ इच्छितो, पण त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे पैशांची सोय करणे. याच निमित्ताने त्याची पुन्हा एकदा सुहानीशी भेट होते.
यावेळी दोघांमध्ये जुनी कटुता मागे पडून प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. पण कथेत नवीन ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा सुहानीचा बॉस रंजीत म्हणजे अपारशक्ती खुराणाची एंट्री होते आणि दोघांच्या आयुष्यात लव्ह ट्रायंगल सुरू होते. आता प्रश्न आहे की, विशाल आणि सुहानी आपले जुने रुसवे फुगवे विसरून एकमेकांच्या जवळ येऊ शकतील का? त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे.
अभिनयाविषयी
वीर पहारिया विशालच्या भूमिकेत सहज आणि चुलबुल्या अंदाजात दिसत आहे. भावनात्मक दृश्यांतही त्याचा अभिनय स्वाभाविक वाटतो. यापूर्वी ते ‘स्काय फोर्स’ चित्रपटात दिसला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. या चित्रपटात त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतो. त्याची चांगली बाब म्हणजे तो सर्व प्रकारच्या भूमिका करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर आफिया सैयदने आपल्या डेब्यू चित्रपटात सुहानीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चित्रपटाच्या रोमँटिक भागाला मनोरंजक बनवते.
अपारशक्ती खुराणाचे नाव ऐकताच अपेक्षा असते की तो काही मजेशीर नक्की करेल. चित्रपटातही त्याचा अंदाज तसाच आहे. तो रंजीतच्या भूमिकेत कॉमेडीचा रंग भरतो. त्याची उपस्थिती अनेक दृश्ये मजेशीर बनवते. राकेश बेदीसह इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे.
चित्रपटाचे संगीत
चित्रपटातील गाणी चांगली आहेत. ‘कहो तो’, ‘तू मेरा रइयो’ आणि ‘इश्क का गुलाम’ यांसारखी गाणी चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवतात. ही गाणी चित्रपटाला कंटाळवाणा होण्यापासून वाचवतात. कधी गाणी रोमान्सला पुढे नेतात, तर कधी कथेतील मस्ती कायम ठेवतात.
दिग्दर्शन आणि लेखन
अपूर्व सिंह कार्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते यापूर्वी ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘भैया जी’ आणि ‘एस्पिरेंट्स’च्या दोन्ही सिझनचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. याची कथा दीपक किंगरानी यांनी लिहिली आहे. दोघांनी मिळून अशी फिल्म बनवली आहे जी फन वॉच म्हणून पाहता येईल. चांगली बाब म्हणजे त्यांनी कथेला व्यर्थ लांबवलेले नाही. चित्रपटाचा रनटाइम २ तास १८ मिनिटे आहे. मात्र, अशा प्रकारच्या कथा यापूर्वीही अनेक चित्रपटांत दिसल्या गेल्या आहेत.