Gay आहे बॉलिवूड अभिनेता, वन नाईट स्टँडनंतर मुलीने केलं ब्लॅकमेल… प्रायव्हेट डिटेक्टिवचा शॉकिंग खुलासा

प्रसिद्ध प्रायव्हेड डिटेक्टिव तान्या पुरी हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तान्याने एका बॉलीवूड अभिनेत्याबद्दल मोठा खुलासा केलाय, ज्याला एका महिलेने ब्लॅकमेल केलं होतं. अभिनेता समलैंगिक असून, त्याच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही..

Gay आहे बॉलिवूड अभिनेता, वन नाईट स्टँडनंतर मुलीने केलं ब्लॅकमेल... प्रायव्हेट डिटेक्टिवचा शॉकिंग खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Nov 07, 2025 | 8:35 AM

Private Detective : प्रायव्हेड डिटेक्टिव तान्या पुरी (Tanya Puri) हिने बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. त्यामुळे तान्या तुफान चर्चेत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींचा विवाबबाह्य संबंधांपासून रॉयल आयुष्य जगण्यासाठी अभिनेत्री एक्सकॉर्टच्या रुपात करत असलेल्या कामाचा खुलासा देखील तान्या हिने केला आहे. एवढंच नाही तर, तान्या हिने बॉलिवूड अभिनेत्याचं देखील मोठं सत्य सांगितलं आहे. अभिनेता समलैंगिक असून त्याचं सत्य इंडस्ट्रीमध्ये देखील फार कोणाला माहिती नाही…

इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग सुरु असते.. असा दावा तान्या हिने केला. एका बॉलिवूड अभिनेत्याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं, खरं तर तो समलैंगिक आहे.. एक महिला त्याला ब्लॅकमेल करत होती आणि त्याच्याकडून पैशांची मागणी करत होती.. हे प्रकरण तान्या हिने मिटवलं.

तान्या म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये ब्लॅकमेलिंगचे प्रकार अनेक घडत असतात. माझ्याकडे असं एक प्रकरण आलं ज्यामध्ये मुलगा समलैंगिक होता आणि त्याचं सत्य कोणाला सांगितलं नव्हतं. अभिनेता समलैंगिक हे सत्य देखील इंडस्ट्रीमध्ये फार कोणाला माहिती देखील नव्हतं.

वन नाईट स्टँडनंतर अभिनेत्याला करण्यात आलं ब्लॅकमेल…

तान्या पुरी पुढे म्हणाली, ‘अभिनेत्याने एका क्लबमध्ये मुलीसोबत वन नाईट स्टँड केलं होतं… मुलीने त्या रात्रीचं पुरावे स्वतःकडे ठेवले आणि अभिनेत्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली… ‘जर तू मला पैसे दिले नाही तर, तुझं गुपित मी सर्वांना सांगेल…’ अशी धमकी मुलही अभिनेत्याला देऊ लागली होती…’

‘अभिनेता त्या मुलीच्या जाळ्यात अडकला आणि त्याने आमच्यासोबत संपर्क साधला… त्या मुलीबद्दल अभिनेत्याला आणखी माहिती हवी होती आणि अभिनेता जाणून घ्यायचं होतं की, ती असं का करत आहे? असे प्रकरण हाताळण्यासाठी अनेक महिने लागतात. अखेर, कोणतेच पुरावे उघड झाले नाहीत. एक तोडगा निघाला. मुलीविरुद्ध पुरावे असल्याने तिला कोणतेही पैसे देण्यात आले नाहीत आणि यामुळे अभिनेत्याला मदत झाली.’ गेल्या काही दिवसांपासून तान्या पुरी सर्वात्र चर्चेत आहे.

झगमगत्या विश्वाबद्दल सांगायचं झालं तर, बाहेरुन ग्लॅमरस आणि आकर्षक दिसणारी इंडस्ट्रीमध्ये अनेक रहस्य दडलेले आहे. बॉलिवूड अभिनेते – अभिनेत्रींचे एकमेकांसोबत आलेले वाद.. कुटुंबातील चार भिंतीमधील वाद… रिलेशनशिप… लग्न… घटस्फोट… अफेअर.., अशा गोष्टी समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसतो.