प्रियांकाचे सासूबाईंसोबत ठुमके!

प्रियांकाचे सासूबाईंसोबत ठुमके!

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा नवरा अमेरिकेतील गायक निक जोनस लवकरच लग्नाच्या बेड़ीत अडकणार आहेत. खरंतर दोघांच्या लग्नाची तारीख अजून समजली नसली तरी, प्रियांकाने लग्नाचं सेलिब्रेशन दणक्यात सुरु केलं आहे. प्रियांकाच्या सेलिब्रेशन पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात प्रियांका तिच्या सासूसोबत डान्स करताना दिसत आहे.

नुकतीच प्रियांकाने ‘ब्राईडल शॉवर पार्टी’चे आयोजन केलं होतं. या शॉवर पार्टीमध्ये प्रियांकाने केवळ मोजक्या आणि खास लोकांना बोलवलं होतं. यामध्ये प्रियांकाच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचा समावेश होता.

या पार्टीत प्रियांकाची सासू डेनीस मिलर-जोनस आणि आई मधू चोप्रा यांनीदेखील आवर्जून हजेरी लावली. याच दरम्यान प्रियांका आणि सासू डेनिस मिलर-जोनस यांनी एका गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रियांकाची आई मधू चोप्रानेदेखील शॉवर पार्टीला आवर्जून हजेरी लावली. या पार्टीत मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे प्रियांकाने परिधान केलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता.

येत्या डिसेंबर महिन्यात निक आणि प्रियांका यांचा जोधपूर येथे विवाह होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याची घोषणा झालेली नाही.

View this post on Instagram

Our desi girl sure knows how to party! Here’s @priyankachopra shaking a leg at her bridal shower yesterday.

A post shared by Filmfare (@filmfare) on

Published On - 6:06 pm, Tue, 30 October 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI