AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jui Gadkari | रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट?” अभिनेत्री जुई गडकरीचा संताप

कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग 50 माणसांचा नियम कुठे गेला?" असे प्रश्न जुईने प्रशासनाला विचारले आहेत. (Jui Gadkari Facebook Post COVID Tests)

Jui Gadkari | रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट? अभिनेत्री जुई गडकरीचा संताप
अभिनेत्री जुई गडकरी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 20, 2021 | 1:32 PM
Share

मुंबई : मॉलमध्ये प्रवेशासाठी कोव्हिडचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केल्यावरुन अभिनेत्री जुई गडकरीने (Marathi Actress Jui Gadkari) संताप व्यक्त केला आहे. ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? असा सवाल जुईने उपस्थित केला आहे. फेसबुकवर आपल्या रागाला वाट मोकळी करुन देताना तिने गर्दीचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर आरोप जुईने केला आहे. (Pudhcha Paool Bigg Boss Marathi fame Marathi Actress Jui Gadkari Facebook Post on COVID Tests)

काय आहे जुई गडकरीची फेसबुक पोस्ट?

“कोव्हिड19 निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग 50 माणसांचा नियम कुठे गेला?” असे प्रश्न जुईने प्रशासनाला विचारले आहेत.

“मॉलमध्ये चिकटून तरी बसत नाहीत”

“आजही काही मोठ्या युनिव्हर्सिटीज (पारुल युनिव्हर्सिटी) कॉन्व्होकेशन करत आहेत, 4500 जणांसह, रुल्स करताय तर सगळीगडे सारखे करा. मॉलमध्ये लोक निदान एकमेकांना चिकटून तरी बसत नाहीत. तरी टेस्ट कम्पलसरी आणि बेस्ट बसेसमध्ये जवळजवळ एकमेकांच्या मांडीत बसतात” असंही जुईने लिहिलंय.

“कोरोनाग्रस्त मैत्रिणीला स्तनपानाची मुभा”

“परवा माझ्या एका मैत्रिणीचा डिलीव्हरी आधी कोव्हिड रिपोर्ट केला आणि तो दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला. तिचा सी सेक्शन करावं लागलं वेगळ्याच हॉस्पिटलला. कारण तिला ज्या हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठि नेलं होतं, त्यांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. विनोदाची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्ण असूनही तिला बाळाला स्तनपान करु दिलं. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवलं होतं. ती असिम्पटमॅटिक होती. त्यांना भरमसाठ बिल भरावं लागलं.” अशी तक्रार जुईने फेसबुक पोस्टमधून मांडली.

“नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. कोरोना खरंच आहे की आता प्रत्येक रुग्णामागे दीड लाख मिळत होते, ते बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर सवालही जुईने उपस्थित केला आहे.

वाचा जुई गडकरीची फेसबुक पोस्ट

Covid-19 -ve report compulsory for entering malls! Ani Thanyacha Jambhli cha market madhe jayla konta report?? Best cha…

Posted by Jui Gadkari on Friday, 19 March 2021

(Pudhcha Paool Bigg Boss Marathi fame Marathi Actress Jui Gadkari Facebook Post on COVID Tests)

कोण आहे जुई गडकरी?

  • पुढचं पाऊल या मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण
  • कल्याणी सरदेशमुखच्या भूमिकेतून जवळपास सहा वर्ष टीव्हीवर अधिराज्य
  • बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात जुईचा सहभाग
  • सोशीक सून ही प्रतिमा मोडून बिग बॉसमध्ये जुईचं वेगळं रुप प्रेक्षकांसमोर
  • वर्तुळ मालिका, सिगिंग स्टार या गायक-अभिनेत्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग
  • प्रख्यात साहित्यिक राम गणेश गडकरी यांची पणती
  • पुढचं पाऊलचा सहकलाकार प्रसाद लिमयेसोबत रिलेशनशीपमध्ये

संबंधित बातम्या : 

कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवणं भोवलं; अभिनेता सोहेल खान आणि अरबाज खानविरोधात गुन्हा

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या

(Pudhcha Paool Bigg Boss Marathi fame Marathi Actress Jui Gadkari Facebook Post on COVID Tests)

Follow Us
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा