सुपरस्टारचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर… 5 वर्षांनी कारण आले समोर

दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाचे कारण जवळपास 5 वर्षांनी समोर आले आहे. स्वत: डॉक्टरांनी याबाबत खुलासा केला आहे.

सुपरस्टारचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर... 5 वर्षांनी कारण आले समोर
Puneeth Rajkumar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 2:59 PM

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाला आता पाच वर्षे उलटली आहेत. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यावेळी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले गेले होते. मात्र आता त्यांचे डॉक्टर रमणा राव यांनी एका मुलाखतीत पूर्णपणे वेगळे चित्र उभे केले आहे. डॉक्टरांच्या मते, पुनीत यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालेले नव्हते.

डॉ. रमणा राव यांनी सांगितले की, ज्या दिवशी पुनीत राजकुमार यांचे निधन झाले, त्या दिवशी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच किकबॉक्सिंगचा प्रयत्न केला होता. जिममध्ये सुमारे दीड तास अतिरिक्त व्यायाम केल्यानंतर ते पूर्णपणे थकून गेले होते. त्यांना घाम फुटला होता. त्या अवस्थेत ते जवळच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. ईसीजी तपासणीत हृदयावर ताण असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने त्यांचे निधन झाले.

Loading...

वाचा: नाना पाटेकरांचा तेव्हा मला फोन आला अन्… भरत जाधवने सांगितलं सगळंच

डॉक्टर नेमकं काय म्हणाले?

‘जस्ट क्युरियस कन्नड’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. रमणा राव यांनी पुनीत यांच्यासोबतच्या मैत्रीची आठवण काढली. ते म्हणाले, “पुनीत माझ्यासाठी कुटुंबातील सदस्य होते. मी त्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे मानत असे. एक डॉक्टर म्हणून मी अनेक दुःखद प्रसंग पाहिले आहेत. पण पुनीत माझ्यासाठी मुलासारखा होता. तो आणि माझा मुलगा खूप चांगले मित्र होते. ते अनेकदा एकत्र खेळायचे आणि खेळणीही एकमेकांसोबत शेअर करायचे.”

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, आपल्या कारकिर्दीत अनेक दुःखद घटनांना सामोरे जावे लागले असले, तरी पुनीतचे निधन अशी घटना आहे जी ते कधीही विसरू शकणार नाहीत. पहिल्यांदा केलेल्या किकबॉक्सिंगनंतर प्रकृती अचानक खालावल्याने आणि हृदयावर आलेल्या ताणामुळे ही दुर्घटना घडली, असे डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us