टोरंटोच्या रस्त्यावर राधिकाचा शर्टलेस अंदाज; फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव

टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. अभिनेत्री राधिका मदनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 5:45 PM
1 / 5
टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक भारतीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या महोत्सवात सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. अभिनेत्री राधिका मदनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक भारतीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या महोत्सवात सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. अभिनेत्री राधिका मदनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5

राधिका लवकरच कच्चे लिंबू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाचा टोंरटो चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

3 / 5

चित्रपटातील राधिकाच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचसोबत फिल्म फेस्टिव्हलमधील तिचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज पहायला मिळाला. यावेळी सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.

4 / 5

राधिकाने काळ्या रंगाचा क्रॉप ब्लेझर घातला होता. मात्र त्याच्या आत तिने शर्ट घातला नव्हता. ब्लॅक पँट आणि हिल्स असा तिचा हा बोल्ड लूक पहायला मिळाला. या लूकमध्ये तिने टोरंटोच्या रस्त्यावर फोटोशूट केलं.

5 / 5

राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. राधिकाचा हा आउटफिट नीता लुल्ला यांनी डिझाइन केला होता. ब्लॅक ब्लेझर आणि पँटसह काही स्टँडआउट दागिने परिधान करत तिने हा लूक पूर्ण केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us