AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Bhatt : मी त्याच्या बरगड्या…राहुल भट्टनं सुप्रसिद्ध अभिनेत्याला केलेली मारहाण, काय घडलेलं?

Rahul Bhatt On Actor : महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टनं अभिनेता रणवीर शौरीला मारहाण केलेली. याबद्दल त्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Rahul Bhatt : मी त्याच्या बरगड्या...राहुल भट्टनं सुप्रसिद्ध अभिनेत्याला केलेली मारहाण, काय घडलेलं?
| Updated on: Sep 30, 2026 | 6:10 PM
Share

अभिनेत्री पूजा भट्ट आणि रणवीर शौरी रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याची खूप चर्चा झालेली. पूजानं रणवीरवर दारूच्या नशेत तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. मात्र, रणवीरनं हे आरोप फेटाळून लावले. उलट त्यानं म्हटलं की, पूजाच्या भावानं त्याच्यावर हल्ला केला. आता, पूजाचा भाऊ राहुल भट्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल भट्टनं सांगितला प्रसंग

राहुल भट्ट सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीत राहुलनं वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राहुल भट्ट म्हणाला, ‘पूजा आणि रणवीरमध्ये मतभेद झाले होते. त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर रणवीरनं पूजाला मारलं. मग मी त्यात पडलो, आणि जेव्हा मी पडलो, तेव्हा मी खूप रागात होतो. मी त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या. मी त्याच्या बरगड्या मोडल्या. मी कायदा हातात घेतला आणि चुकीचं काम केलं. मग मला त्याची किंमत चुकवावी लागली. मला अटक झाली.’

राहुल भट्टला होतोय पश्चाताप

राहुल भट्ट पुढे म्हणाला की, ‘मला पश्चात्ताप होतोय. मी असं करायला नको होतं. त्यावेळी मी म्हणालो होतो की मी हे पुन्हा करेन. पण मी रणवीरसोबत असं करायला नको होतं. तो सभ्य होता. या सगळ्या प्रकरणानंतर लोक अनेकदा अशा परिस्थितीचा फायदा घेऊन पैसे उकळतात. पण त्याने तसं केलं नाही. उलट, तो पुढे आला आणि त्याने प्रकरण मिटवलं. माझ्याविरुद्धची तक्रार मागे घेण्यात आली. त्यावेळी माझ्यावर एक फौजदारी गुन्हा दाखल होता. मी त्यासाठी त्याचा आदर करतो. असं कोणी करत नाही.’

दरम्यान, रणवीर शौरीसोबतच्या ब्रेकअपनंतर पूजाने मनीष मखिजासोबत लग्न केलं. त्यांचं लग्न २००३ मध्ये झालं. रणवीरने २०१० मध्ये कोंकणा सेन शर्मासोबत लग्न केलं. पण, दोन्ही कलाकारांची लग्न फार काळ टिकली नाहीत आणि त्यांचा घटस्फोट झाला.

Follow Us
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा