राजेश खन्ना यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण त्यामधील गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, 50 वर्षांनंतरही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये

राजेश खन्ना यांचा सर्वात फ्लॉप चित्रपट. मात्र, त्यामधील गाणं ठरलं त्यांच्या कारकि‍र्दीमधील सर्वात सुपरहिट गाणं. 50 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये आहे सुपरहिट.

राजेश खन्ना यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण त्यामधील गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, 50 वर्षांनंतरही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 26, 2026 | 4:02 PM

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या चित्रपटांमधील गाणीही प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत असा एक चित्रपटही होता, जो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही; मात्र त्यातील एका गाण्याने मात्र प्रचंड लोकप्रियता मिळवत अजरामर स्थान मिळवलं.

हा चित्रपट म्हणजे 1976 साली प्रदर्शित झालेला ‘महबूबा’. शक्ती सामंत दिग्दर्शित या चित्रपटात राजेश खन्ना आणि हेमा मालिनी ही लोकप्रिय जोडी झळकली होती. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र याच चित्रपटातील ‘मेरे नैना सावन भादों’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू

‘मेरे नैना सावन भादों’ या गाण्याचे बोल गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले असून, संगीत आर. डी. बर्मन यांनी दिलं होतं. या गाण्याचे दोन वेगवेगळे व्हर्जन रेकॉर्ड करण्यात आले होते. एक व्हर्जन किशोर कुमार यांनी, तर दुसरं लता मंगेशकर यांनी गायलं.

किशोर कुमार यांच्या आवाजातील या गाण्यात विरह, प्रतीक्षा आणि अधुऱ्या प्रेमाची भावना प्रभावीपणे जाणवते. दुसरीकडे लता मंगेशकर यांच्या आवाजातील व्हर्जनलाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. दोन्ही व्हर्जन आजही संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.

50 वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता कायम

या गाण्याची लोकप्रियता आजच्या डिजिटल युगातही कायम असल्याचं त्याच्या ऑनलाइन व्ह्यूजवरून दिसून येतं. सप्टेंबर 2026 पर्यंत सारेगामा म्युझिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर किशोर कुमार यांच्या व्हर्जनला 94 लाखांहून अधिक, तर लता मंगेशकर यांच्या व्हर्जनला 6.35 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर विशेष यश न मिळवू शकलेला ‘महबूबा’ हा चित्रपट एका गाण्यामुळे मात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘मेरे नैना सावन भादों’ हे गाणं गेल्या पाच दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असून, सदाबहार हिंदी गाण्यांच्या यादीत त्याचं स्थान आजही कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us