Video : खरकटया ताटावर रेघोट्याची झालरं… हातावर पोट, बिदागीची झुनका भाकरं… शालूचा हा अंदाज पाहाच!

शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.

Video : खरकटया ताटावर रेघोट्याची झालरं... हातावर पोट, बिदागीची झुनका भाकरं... शालूचा हा अंदाज पाहाच!
| Updated on: Feb 27, 2021 | 11:07 AM

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटात शालूची भूमिका साकारून फक्त नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर हाॅट फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना घायाळ करत आहे. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. (Rajeshwari Kharat’s dance video goes viral on social media)

राजेश्वरीचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांनाही धक्काच लागला होता. नुकताच शालूने तिच्या सोशल मीडियावर तिचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शालू धीमे-धीमे, धीमे-धीमे, धीमे-धीमे या हिंदी गाण्यावर डान्स केला होता. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

‘फँड्री’ चित्रपटानंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले होते. मात्र, म्हणावा तसा या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला नाही. राजेश्वरी मुळ पुण्याची आहे. फँड्री चित्रपटात शालूने काम केले त्यावेळी शालू दहावीमध्ये शिकत होती.

संबंधित बातम्या : 

Video : ‘जीव चिमटीत असा घावला, तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…’ शालूच्या ठसकेबाज अदा पाहाच!

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

(Rajeshwari Kharat’s dance video goes viral on social media)