Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आपल्या चित्रपटांतून वेगळे विचार करायला भाग पाडणारे विषय मांडत असतात.

Video : 'सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही...'; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आपल्या चित्रपटांतून वेगळे विचार करायला भाग पाडणारे विषय मांडत असतात. नागराज यांचा असाचं एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘फँड्री’ या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांच्यासह आणखी एक कलाकार आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरली होती. (Rajeshwari Kharat’s video went viral on social media, fans liked it)

ती म्हणजे चित्रपटातील शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी तिने तिच्या नजरेनेचं सगळ्यांची मने जिंकली होती.  तिच्या चेहऱ्यावरील तो अभिनय चाहत्यांना भावला होता. चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही.

राजेश्वरी सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये इंग्लिश गाण्यावर चालताना दिसत आहे.  शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. काही काळापूर्वी केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया शेअर केले आहेत. त्यात ती वेगळ्याचं रूपात दिसत होती.

संबंधित बातम्या : 

Video | नजरंत मावतीया तरी दूर धावतीया, मनीचा ठाव तुला मिळंना, शालूचा डान्स पाहून चाहते घायाळ!

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

(Rajeshwari Kharat’s video went viral on social media, fans liked it)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI