AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे तू तर नपुंसक! तरुणाला हिणवणं अंगाशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Rakhi Sawant : 'राखी का इन्साफ' या शोमध्ये एका तरुणाला 'नपुंसक' म्हटल्याचा आरोप असलेल्या चित्रपट अभिनेत्री राखी सावंतविरोधात झाशी न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्या तरुणाने आत्महत्या केली होती.

अरे तू तर नपुंसक! तरुणाला हिणवणं अंगाशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
| Updated on: Oct 17, 2026 | 8:43 PM
Share

झाशी न्यायालयानं चित्रपट अभिनेत्री राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. एका खाजगी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘राखी का इन्साफ’ या कार्यक्रमात राखीनं झाशीतील एका तरुणाला नपुंसक म्हटलेलं आणि त्यानंतर त्या तरुणानं आत्महत्या केली, असा आरोप आहे. सिव्हिल जज ज्युडिशियल (एफटीसी सीएडब्ल्यू) अंजली न्यायालयानं राखी सावंत आणि तिच्या टीमला १ डिसेंबर २०२६ रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. हा गुन्हा २०१० मध्ये प्रेमनगर पोलिसांनी दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली, परंतु राखी सुनावणीसाठी हजरही राहत नव्हती.

जिल्हा सरकारी वकील (फौजदारी) मृदुलकांत श्रीवास्तव यांनी सांगितलं की, २०१० मध्ये एका वृत्तवाहिनीवर (एनडीटीव्ही इमेजिंग) ‘राखी का इन्साफ’ नावाच्या कार्यक्रमादरम्यान, कार्यक्रमाची सूत्रसंचालिका राखी सावंतनं झाशीच्या प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हन्सारी येथील रहिवासी लक्ष्मणला त्याची पत्नी आणि कुटुंबासमोर शिवीगाळ केली आणि घाबरट म्हटलं. हा कार्यक्रम देशभरात प्रसारित झाल्यानंतर, लक्ष्मण घरी परतला आणि काही दिवसांनी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

राखी सावंतच्या कार्यक्रमात कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली एक महिला आणि तिचा पती समोरासमोर बसलेले दाखवण्यात आले होते. प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हन्सारी येथील रहिवासी अनितानं या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. अर्ज मिळाल्यानंतर, अनिता आणि तिचा पती लक्ष्मण अहिरवार यांना त्यांच्या कुटुंबीयांसह राखी सावंतच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान राखी सावंतनं लक्ष्मणला भित्रा म्हटलं आणि दोन-तीन वेळा त्याला शिवीगाळ केली. कार्यक्रम संपल्यानंतर अनिता आणि तिचा पती लक्ष्मण झाशी येथील त्यांच्या घरी परतले. ९ नोव्हेंबर २०१० रोजी लक्ष्मणने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लक्ष्मणच्या कुटुंबियांचे आरोप

लक्ष्मण अहिरवारच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने एका थेट टीव्ही शोमध्ये त्याला नपुंसक म्हणून हिणवलं, ज्यामुळे त्याची प्रतिमा डागाळली आणि लोक त्याची बदनामी करत होते. लक्ष्मण अहिरवारने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री आणि तिच्या टीमनं अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, प्रेम नगर पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आणि तिच्या टीमविरुद्ध गुन्हा क्रमांक ५७२/२०१०, कलम २९४, ५००, ५०१ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रेम नगरनंतर तपास सिप्री बाजार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तपासाअंती, पोलिसांनी राखी सावंत आणि इतरांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी, न्यायालयानं बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत इत्यादींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आणि पोलिसांना त्यांना अटक करून १ डिसेंबर २०२६ रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट