Rakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते, एनसीबी चौकशी दरम्यान रकुल प्रीत सिंहची कबुली

एनसीबीने रकुल प्रीत सिंहला समन्स बजावला होता. मात्र, सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली.

Rakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते, एनसीबी चौकशी दरम्यान रकुल प्रीत सिंहची कबुली

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाव आलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh At NCB Office) एनसीबीसमोर हजर झाली. एनसीबीकडून आज तिची चौकशी केली गेली. एनसीबीने रकुल प्रीत सिंहला समन्स बजावला होता. मात्र, सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली. त्यानंतर तिने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आणि आज तिची चौकशीही केली गेली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे (Rakul Preet Singh At NCB Office).

एनसीबी चौकशी दरम्यान, आपण ड्रग्ज बाळगले असल्याचे रकुल प्रीतने कबुल केले आहे. मात्र, ड्रग्ज सेवन करण्याचा आरोप अभिनेत्रीने फेटाळून लावाला. ‘2018मध्ये आपण रिया चक्रवर्तीसह ड्रग्ज चॅट केले होते. मेसेज करून रिया तिचे ड्रग्ज मागत होती. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज माझ्या घरात होते’, असे रकुल प्रीतने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.

फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांना 24 सप्टेंबरला एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापैकी सिमॉन खंबाटा त्याच दिवशी एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली. तर आज रकुल प्रीत सिंहची चौकशी होत आहे.

LIVE UPDATES 

Picture

रकुल प्रीतने दिला कबुलीजबाब

‘2018मध्ये आपण रिया चक्रवर्तीसह ड्रग्ज चॅट केले होते. मेसेज करून रिया तिचे ड्रग्ज मागत होती. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज माझ्या घरात होते’, असे रकुल प्रीतने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.

25/09/2020,2:51PM
Picture

दीपिका पदुकोण होती ड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन

करिश्मा प्रकाशने खुलासा केला आहे की, दीपिका पदुकोणने व्हाट्स अॅप ग्रुप बनविला होता. त्यात ती, करिश्मा आणि जया साहा होते. दीपिका या ग्रुपवर ड्रग्जची मागणी करायची.

25/09/2020,2:49PM
Picture

रकुल प्रीतची चौकशी संपली

ड्रग्ज घरात ठेवल्याची कबुली. मात्र, ड्रग्ज घेतले नसल्याचा अभिनेत्रीचा दावा

25/09/2020,2:47PM
Picture

रकुल प्रीत सिंहची चौकशी सुरू

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून समन्स मिळाल्याने एनसीबी कार्यालयात पोहोचलेल्या रकुल प्रीत सिंहच्या चौकशीला सुरुवात

25/09/2020,12:04PM
Picture

करिश्मा प्रकाश एनसीबी कार्यलयात

दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश चौकशीकरिता एनसीबी कार्यलयात दाखल झाली आहे.

25/09/2020,11:00AM
  • रकुल प्रीत सिंह एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. तिथे एनसीबीचे अधिकारी उपस्थित आहेत. ते रकुल प्रीतची चौकशी करणार आहे
  • रकुल प्रीत 10 वाजताच्या सुमारास तिच्या घरुन एनसीबीच्या कार्यालयाकडे रवाना झाली.
  • दीपिका पदुकोणने चौकशीसाठी उद्याची वेळ मागितली
  • श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचीही उद्या चौकशी होणार

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काल रात्री मुंबईत दाखल झाली. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं कळवलं. आज दीपिकाची कोव्हिड टेस्ट होण्याचीही शक्यता आहे. टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर ती चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे.

दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंगही वकिलांची जुळवाजुळव करत आहे. त्याने एनसीबीला पत्र लिहून चौकशीदरम्यान सोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. दीपिकाला डिप्रेशन आणि एन्झायटीचा त्रास असल्याचं कारण त्याने दिलं आहे. या प्रकरणी एनसीबी आज परवानगी देणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

Rakul Preet Singh At NCB Office

संबंधित बातम्या :

बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात, आगामी चित्रपटांमधील कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *