4000 कोटींच्या ‘रामायण’चं ॲडव्हान्स बुकिंग कधी होणार सुरू? मोठी अपडेट समोर
नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला रामायण हा चित्रपट येत्या 5 नोव्हेंबरला जगभरात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल मेठी क्रेझ पहायला मिळत आहे. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

रणबीर कपूर, रॉकिंग स्टार यश आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढू लागली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट रिलीज होणार असून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या, म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू होणार असून भारतातील सर्व प्रमुख बकिंग प्लॅटफॉर्म्सवर तिकीटं उपलब्ध होतील. 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरात रिलीज होणाऱ्या या चित्रटाच्या थिएट्रिकल रिलीजपूर्वी प्रेक्षक प्रीमिअम फॉर्मॅटमध्ये मोठ्या पडद्यावर ‘रामायणा’चं भव्य-दिव्य जग अनुभवू शकतात. त्यासाठी तिकीट बूक करू शकतात. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट नमित मल्होत्राच्या प्राईम फोकस स्टुडिओने यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स सोबत प्रोड्यूस का आहे. दोन भागात बनणाऱ्या या चित्रपटात अनेक मोठमोठे कलाकार आणि आंतरराष्ट्रीय स्तरवारील क्रिएटिव्ह टीम सोबत आहे.
बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दोन दिग्गज संगीतकारांनी सांभाळली आहे. ऑस्करविजेते भारतीय संगीतकार ए. आर. रहमान आणि हॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर हे दोघे या भव्य चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्या या सहकार्यामुळे चित्रपटाच्या संगीताबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘रामायण’ हा चित्रपट आयमॅक्ससह विविध प्रीमियम फॉरमॅट्समध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. भारतीय संस्कृतीतील या महान महाकाव्याची भव्यता जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रामायण’साठी ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांची जोडी; यशने व्यक्त केला आनंद, म्हणाला…
‘रामायण’साठी ए. आर. रहमान आणि हान्स झिमर एकत्र आल्याबद्दल अभिनेता यशने आनंद व्यक्त केला. यावेळी त्याने ए. आर. रहमान यांच्या संगीताशी जोडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. यश म्हणाला, “मी लहानपणी त्यांच्या गाण्यांवर डान्स करायचो. ‘चिक्कुबुक्कु चिक्कुबुक्कु रेल’ हे गाणं मला आठवतं. शाळेत असताना मी त्यांच्या अनेक गाण्यांवर नाचायचो. मी त्यांनाही सांगितलं की, शाळा आणि कॉलेजमध्ये असताना त्यांच्या गाण्यांवर डान्स करणं हा माझ्या आयुष्याचा एक भाग होता. कन्नड प्रेक्षकांशी त्यांचं असलेलं नातं चांगलंच माहीत आहे. मात्र, आजच्या पिढीला याबद्दल कितपत माहिती आहे, हे मला माहीत नाही. त्यांनी कन्नडमधील अनेक चित्रपटांसाठीही संगीत दिलं आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद होत आहे. ते कर्नाटकचाही एक भाग आहेत, असं वाटतं. त्यांनी आम्हाला इतकं सुंदर संगीत दिलं आहे. ‘रामायण’चा भाग बनल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!” असं तो म्हणाला.