Ramayana : रामायणाची ॲडवान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीज आधीच कमावले इतके कोटी

रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच त्याची बॉक्स ऑफिसवर चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने प्री बुकिंग सुरू केले होते. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.सिनेमा रिलीज होण्याआधीच प्री बुकिंगमधून कोट्यांवधींची कमाई केली आहे.

Ramayana :  रामायणाची ॲडवान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीज आधीच कमावले इतके कोटी
ranbir kapoor ramayana
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 26, 2026 | 9:34 PM

रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच त्याची बॉक्स ऑफिसवर चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने प्री बुकिंग सुरू केले होते. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.सिनेमा रिलीज होण्याआधीच प्री बुकिंगमधून कोट्यांवधींची कमाई केली आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच इतक्या मोठ्या कमाईचा टप्पा पार करणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे.

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत ‘रामायण ‘ च्या भारतातील पहिल्या दिवसाच्या अॅडवान्स बुकिंगमधून ब्लॉक केलेल्या जागांसह सुमारे 11.78 कोटी रूपयांची कमाई झाली आहे. चित्रपटाच्या 4,658 शोसाठी 2.14 लाख तिकिटे विकली गेली आहे. ब्लॉक केलेल्या जागांची गणना वगळल्यास कमाईचा आकडा सुमारे 9.56 कोटी आहे.

Loading...

याशिवाय दिवसभरात आकडे आणखी वाढले. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत भारतातील अॅडवान्स बुकिंगमधून सुमारे 11.96 कोटी रूपयांची उलाढाल झाली. त्यावेळी 2.18 लाख तिकिटांची विक्री झाली. तसेच जगभरातील अॅडवान्स बुकिंगचा आकडा 20 कोटी रूपयांच्या पुढे गेल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कमाई

राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती आहे.26 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 2.57 कोटी रूपयांची अॅडवान्स बुकिंग झाली आहे. त्यानंतर दिल्ली आणि कर्नाटकाचा क्रमांक आहे.शहरांमध्ये दिल्ली – NCR मधून सर्वाधिक बुकिंग झालं, तर मुंबईही आघाडीच्या शहरांमध्ये आहे.

 

हिंदी आवृतीला सर्वाधिक प्रतिसाद

चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगमध्ये हिंदी आवृत्तीचा मोठा वाटा आहे. हिंदी 3 डी आवृत्तीच्या तिकिटांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आकडेवारीवरून दिसतं आहे. मात्र हे आकडे सतत बदलत असतात.त्यामुळे अंतिम आकडेवारी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बदलू शकते.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ मध्ये रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी देओल हनुमान, तर रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीत रिलीज होणार आहे. अॅडवान्स बुकिंगसाठी जर इतका प्रतिसाद मिळाला आहे. तर रिलीज झाल्यानंतरही हा सिनेमा किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us