रणबीर कपूरचा पापाराझींवर संताप, आलिया-विकीसमोरच सुनावलं, Video व्हायरल, नेमकं काय घडलं?

'खूप बोलत आहे तू', आलिया भट्ट, विक्की कौशलच्या समोरच रणबीर कपूर पापाराझींवर भडकला. ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटबाहेर नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.

रणबीर कपूरचा पापाराझींवर संताप, आलिया-विकीसमोरच सुनावलं, Video व्हायरल, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 27, 2026 | 8:03 PM

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतेच या तिघांचे फर्स्ट लूक पोस्टर्स समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी आपल्या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत एका ठिकाणी स्पॉट झाले. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याच प्रसंगातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर पापाराझींवर नाराज झालेला दिसत आहे.

‘बहुत बोल रहा है तू’

कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यानंतर रणबीर, आलिया, विकी आणि संजय लीला भन्साळी आपापल्या गाड्यांकडे निघाले. त्यावेळी पापाराझींनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि मोठमोठ्याने त्यांची नावे पुकारण्यास सुरुवात केली. हा गोंधळ आणि आरडाओरडा पाहून रणबीरचा पारा चढला. तो मागे वळला आणि एका फोटोग्राफरला कठोर शब्दांत ‘बहुत बोल रहा है तू’ असे म्हणताना दिसला.

रणबीरचा हा रागीट अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. या प्रसंगी रणबीर ऑलिव्ह-ग्रीन शॉर्ट कुर्ता आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसला. आलिया भट्टने नियॉन-ग्रीन ड्रेस परिधान केला होता, तर विकी कौशल व्हाइट शर्ट आणि ब्लॅक ट्राउझरमध्ये दिसला.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत यापूर्वी अनेकदा बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला हा चित्रपट ख्रिसमस 2025 मध्ये प्रदर्शित होणार होता. त्यानंतर प्रदर्शन मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. आता हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्स्ट लूक पोस्टर्समध्ये रणबीर, आलिया आणि विकी यांचे वेगवेगळे आणि दमदार लूक पाहायला मिळाले. रणबीर रक्ताचे डाग आणि शर्टवर गोळीच्या खुणांसह रफ-टफ अवतारात दिसत आहे. आलियाचा कॅबरे-प्रेरित ग्लॅमरस लूक लक्ष वेधून घेत आहे, तर विकी कौशल सिगारेट ओढताना इंटेन्स अंदाजात दिसतो. त्यामुळे भन्साळी यांचा हा लव्ह ट्रायंगल नेमका कसा असेल, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us