रणवीर सिंह रंगेबेरंगी कपडे का घालतो? उत्तर सापडलं!

अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावरही रणवीर सिंहला ट्रोल करण्यात आले आहे.

रणवीर सिंह रंगेबेरंगी कपडे का घालतो? उत्तर सापडलं!

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावरही रणवीर सिंहला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र फादर्स डेच्या निमित्ताने अशा प्रकारचे फॅशन आणि कपडे घालण्याच्या आयडिया कुठून येताl याबद्दल रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितले आहे.

रणवीर सिंहने फादर् डेच्या निमित्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडील जगजीत सिंह भवनानी यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये रणवीर सिंहचे वडील सिल्व्हर मॅटेलिक जॅकटमध्ये दिसत आहेत. रणवीर सिंह यांच्या वडिलांचा फोटो पाहून समजू शकते की रणवीरला फॅशनच्या आयडिया आपल्या वडिलांकडून मिळतात. रणवीरने आपल्या वडिलांच्या फोटोला कॅप्शन दिले आहेत, well, now you Know …. #hypebeast #happyfathersday #iloveyoupapa.’

 

View this post on Instagram

 

well, now you Know …. ??‍? #og #hypebeast #happyfathersday #iloveyoupapa

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंह सध्या 83 चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर आधारीत आहे. रणवीर सिंह यामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोणही कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दीपवीरचे चाहतेही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *