रश्मिका श्रीमंत की विजय? एक बॉलिवूडमध्ये हिट तर एक फ्लॉप, तरीही तगडी संपत्ती, एकदा आकडा तर पहा…

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: रश्मिका श्रीमंत की विजय तुम्हाला माहितीये? एक बॉलिवूडमध्ये हिट तर एक फ्लॉप... दोघांच्या संपत्ती आकडा थक्क करणारा आहेत पण कार कलेक्शन तर...

रश्मिका श्रीमंत की विजय? एक बॉलिवूडमध्ये हिट तर एक फ्लॉप, तरीही तगडी संपत्ती, एकदा आकडा तर पहा...
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
| Updated on: Feb 25, 2026 | 1:18 PM

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. पण दोघांनी देखील कधीच खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं नाही. थेट लग्नाची पत्रिकाच सोशल मीडियावर व्हायरल केली. आता रश्मिका आणि विजय यांचं नातं लवकरच पती – पत्नीच्या नात्यात बदलणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे दोघांचा शाही विवाह होणार आहे. आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. रश्मिका आणि विजय लग्नबंनात अडकणार असल्यामुळे चाहत्यांता उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.. दरम्यान, विजय आणि रश्मिका यांची नेटवर्थ किती? अशी चर्चा देखील रंगली आहे. त्यांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

किती आहे रश्मिका मंदाना हिची नेटवर्थ?

– 2026 मध्ये रश्मिका मंदाना हिची अंदाजे संपत्ती एकूण 66 कोटी रुपये आहे. तिने ही संपत्ती तिच्या सिनेमाचं मानधन आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळवली आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्री प्रत्येक सिनेमासाठी 4 ते 8 कोटी रुपये मानधन घेते.

– ‘पुष्पा’ सारख्या दमदार सिनेमात काम केल्यांमुळे रश्मिका हिच्या मानधनात देखील मोठी वाढ झाली आहे. रश्मिका हिने एका प्रोजेक्टसाठी 10 कोटी रुपयांपर्यंत देखील मानधन घेतलं आहे.

– सिनेमांव्यतिरिक्त, रश्मिका दागिने, सौंदर्य, पेय आणि ग्राहक ब्रँडसह ब्रँड भागीदारीतून मोठ्या प्रमाणात कमाई करते. या यादीमध्ये स्वारोवस्की, बोट, कल्याण ज्वेलर्स, 7UP आणि मीशो यांचा समावेश आहे. ती व्हेगन ब्युटी ब्रँड प्लममध्ये गुंतवणूकदार म्हणूनही हिस्सेदारी ठेवते.

– रश्मिका हिची प्रॉपर्टी देखील देशभर पसरलेली आहे. बेंगळुरू, मुंबई, गोवा, हैदराबाद आणि कूर्गमधील मालमत्तांचा समावेश आहे, तिच्या बेंगळुरूमधील घराची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्या गॅरेजमध्ये देखील आलिशान गाड्या आहेत. ऑडी क्यू 3, रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज-बेंझ सी-क्लास आणि इतर अनेक गाड्यांच्या मॉडेल्सचा समावेश आहे.

विजय देवरकोंडा याची संपत्ती?

रश्मिका हिच्या नवऱ्याची संपत्ती देखील काही कमी नाही… विजय याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो टॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत त्याची संपत्ती जवळपास 66 ते 70 कोटी रुपयांपर्यंत आहे. अभिनेता सिनेमे आणि अन्य मार्गांनी देखील पैसे कमावतो…

– रिपोर्टनुसार अभिनेता एका सिनेमासाठी तब्बल 12 – 15 कोटी रुपये मानधन घेतो… तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो, ज्याची किंमत अनेकदा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. विजय सोशल मीडियावर एक पोस्ट करण्याचे तब्बल 40 लाख रुपये मानधन घेतो…

– अभिनयाव्यतिरिक्त, विजयच्या आर्थिक गुंतवणुकीत त्याचा कपड्यांचा ब्रँड राउडी वेअर समाविष्ट आहे. हैदराबाद ब्लॅक हॉक्स व्हॉलीबॉल संघातही त्याचा हिस्सा आहे. त्याची रॉयल जीवनशैली त्याच्या हैदराबादमधील घरात दिसून येते, ज्याची किंमत अंदाजे 15 कोटी रुपये आहे.

– विजय याच्या गॅरेजमध्ये बीएमडब्ल्यू 5 सिरीज, फोर्ड मस्टँग, व्होल्वो एक्ससी 90, मर्सिडीज-बेंझ जीएलएस आणि रेंज रोव्हर सारख्या लक्झरी कार आहेत.