New James Bond : ‘007’ अखेर जेम्स बॉन्डच्या रोलसाठी नवीन चेहरा ठरला, ‘या’ अभिनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

हॉलिवूड चित्रपटप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेम्स बॉन्डची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण आता त्या अभिनेत्याचे नाव जाहीर झाले आहे. तो कलाकार आता जेम्स बाँन्डची भूमिका कशी साकारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

New James Bond :  ‘007’ अखेर जेम्स बॉन्डच्या रोलसाठी नवीन चेहरा ठरला, ‘या’ अभिनेत्याच्या  नावावर शिक्कामोर्तब
007 JAMES BOND
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 17, 2026 | 2:19 PM

हॉलीवुड अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन आता जगप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बॉन्डच्या भूमिकेत दिसणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पुढचा जेम्स बॉन्ड कोण असणार? याबाबत चर्चा सुरू होती अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ॲमेझॉन MGM स्टुडिओ नोव्हेंबर रोजी पॅटिन्सन नावाची अधिकृत घोषणा केली. यासह तो अधिकृत जेम्स बॉन्ड चित्रपट मालिकेत 007 ची भूमिका साकारणारा 7 वा अभिनेता ठरणार आहे.

 

Loading...

रॉबर्ट पॅटिन्सन हा ‘ट्वायलाइट’ चित्रपट मालिकेमुळे जगभरात लोकप्रिय झाला. त्यानंतर ‘द बॅटमॅन’, ‘टेनेट’ आणि ‘मिकी 17′ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जेम्स बॉन्डच्या या भूमिकेसाठी त्याला इतर चार अभिनेत्यांशी स्पर्धा करावी लागली. निकोलस हॉल्ट, जॅक लोडन, जोश ओ कॉनर टर्नर यांच्यासह 5 अभिनेत्यांच्या लंडनमध्ये स्क्रिन टेस्ट घेण्यात आल्या होत्या. अखेर सर्वांवर मात करत रॉबर्टने ही भूमिका मिळवली.

या भूमिकेची घोषणा झाल्यानंतर रॉबर्टनेही ही संधी म्हणजे आयुष्यातील मोठ्या सन्मान असल्याचे भावना व्यक्त केली. जेम्स बॉन्ड सारखी प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने दिग्दर्शक डेनिस व्हिलेन्यूव्ह आणि निर्मात्यांचे आभार मानले सध्या रॉबर्ट जवळ 40 वर्ष आहे त्याच्या अभिनयातील वेगळेपणा आणि गंभीर व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

याआधी जेम्स बॉन्डची भूमिका सीन कॉनरी, जॉर्ज लेझेनबी, रॉजर मूर,टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रॉसनन आणि डॅनियल क्रेग यांनी साकारली होती. या मालिकेची सुरूवात 1962 मध्ये ‘डॉ. नो’ या चित्रपटापासून झाली. डॅनियल क्रेगने 2006 मध्ये ‘कॅसिनो रॉयल’ मधून बाँडच्या भूमिकेत पदार्पण केले आणि पाच चित्रपटांमध्ये ही भूमिका साकारली. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नो टाईम टू डाय’ मधून त्याने या व्यक्तिरेखेला निरोप दिला या चित्रपटाच्या शेवटी बॉन्डचा मृत्यू दाखवण्यात आला होता त्यामुळे आता नवा अभिनेता 7 वी व्यकिरेखा पुन्हा पडद्यावर कसा सादर करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आगामी जेम्स बॉन्ड चित्रपटाचे दिग्दर्शन डेनिस व्हिलेन्यू्ह करणार आहेत. ड्यून आणि अरायव्हल सारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. पीकी ब्लाइंडर्स या मालिकेत स्टीव्हन नाईट चित्रपटाची पटकथा लिहिणार आहेत. एमी पास्कल आणि डेव्हिड हेमन निर्मितीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

या चित्रपटाचे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेम्स बॉन्ड मालिकेवरील नियंत्रण आता ॲमेझॉन MGM स्टुडिओकडे आहे 2025 मध्ये दीर्घकाळ या मालिकेचे हक्क सांभाळणारे बार्बरा ब्रोकली आणि मायकेल जी. विल्सन यांनी अॅमेझॉनसोबतच्या करारनंतर नियंत्रण सोपवले. त्यामुळे नव्या बॉन्ड चित्रपटाची निर्मिती ही या बदलानंतरची पहिली मोठी पायरी ठरणार आहे.

हा जेम्स बॉन्ड मालिकेतील 26 वा अधिकृत चित्रपट असणार आहे चित्रपटाचे नाव चित्रीकरणाची सुरुवात आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे रॉबर्ट पॅटिसन्स आपल्या शैलीत ‘007’ भूमिका कशी साकारतो याकडे आता जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us