Hrithik Roshan: मी 11 मिनिटे हृतिक रोशनला मारलं… अभिनेत्याने स्वत:च सांगून टाकलं सर्वकाही

Hrithik Roshan: एका अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सुपरस्टार हृतिक रोशनसोबतचा किस्सा सांगितला आहे. त्याने हृतिकला जवळपास 11 मिनिटे मारहाण केली होती.

Hrithik Roshan: मी 11 मिनिटे हृतिक रोशनला मारलं... अभिनेत्याने स्वत:च सांगून टाकलं सर्वकाही
Hritik Roshan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 9:26 PM

बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी सेटवर घडलेल्या गोष्टी असतील तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यातील घटना असतील चाहत्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे असते. नुकताच एका अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सुपरस्टार हृतिक रोशनसोबतचा किस्सा सांगितला आहे. त्याने सेटवर हृतिकला जवळपास 11 मिनिटे मारहाण केली. आता नेमकं काय घडलं होतं? कोणी हृतिक रोशनला मारहाण केली? चला जाणून घेऊया…

अभिनेता रोहित रॉयने दिलेल्या एका मुलाखतीत सुपरस्टार हृतिक रोशनबद्दल बोलताना एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्याने चित्रपट ‘काबिल’च्या शूटिंगच्या वेळच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रोहित रॉय म्हणाला की एका सीनमध्ये दोघांचे भांडण झाले होते आणि हृतिकने स्वतः पुढे येऊन रोहितला मारण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर रोहितने कोणताही विचार न करता हृतिकला 11 मिनिटे मारहाण केली होती. तेव्हा हृतिक हा 17 वर्षांचा होता. तेव्हा पासून रोहित रॉय हा हृतिकला ओळखतो. हृतिक प्रेमाने रोहितला कोको म्हणून हाक मारायचा. दोघांनी 2017मध्ये काबिल सिनेमामध्ये काम केले आहे.

Loading...

11 मिनिटे केली मारहाण

रोहित रॉयने पुढे ‘काबिल’ चित्रपटाच्या ११ मिनिटांच्या क्लायमॅक्स सीनची आठवण करुन दिली. या सीनमध्ये दोन्ही अभिनेत्यांचा फाइट सीन होता. रोहितने सांगितले की शूटिंगच्या वेळी तो हृतिकला व्यवस्थित मारत नव्हता, तेव्हा हृतिकने स्वतः त्याला सांगितले की ये आणि मार. अभिनेता म्हणाला की, “हृतिक माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘रोहित, तू पूर्ण ताकदीने का मारत नाही?’”

हृतिकचे बोलणे ऐकून रोहित म्हणाला, “भाई तुम्ही सुपरस्टार आहात आणि या चित्रपटाचे प्रॉड्युसरही आहात.” पुढे रोहित म्हणाला होता की, “जर तुम्हाला काही झाले तर माझा चेक अडकून पडेल.” रोहितचे बोलणे ऐकून हृतिकने त्याला सांगितले की, “जर तुम्ही जोराने मारले नाहीत तर माझ्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळणार नाही. मला मारा.” रोहितने पुढे सांगितले की, “मग पूर्ण ११ मिनिटे मी त्याला जोरदार मारले.”

पुढे रोहितने सांगितले की एका सीनमध्ये त्याला बेशुद्ध होऊन पडायचे होते आणि सीन शूटिंगसाठी तयार होता. तेव्हा ऋतिकने येऊन विचारले, “रोहित, तुमची क्रॅश मॅट कुठे आहे?” पण नंतर असे समोर आले की रोहितसाठी मॅटच लावलेला नव्हता, कारण शूटिंग संपायला फक्त १५ मिनिटे बाकी होती आणि फाइट मास्टर आपले सारे सामान गोळा करून तयार झाले होते. मात्र हृतिकने रोहितसाठी स्वतःचा क्रॅश मॅट मागवला आणि सीन पूर्ण केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us