AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Pilgaonkar : ट्रोलर्स महाराष्ट्राची पोरं आणि ती माझीच…सचिन पिळगांवकर यांचं वक्तव्य चर्चेत

Sachin Pilgaonkar : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता सचिन यांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.

Sachin Pilgaonkar : ट्रोलर्स महाराष्ट्राची पोरं आणि ती माझीच...सचिन पिळगांवकर यांचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Oct 18, 2026 | 6:46 PM
Share

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. सचिन आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यामुळे ते अनेक मुलाखतींमध्ये इंडस्ट्रीतील त्यांचे अनुभव शेअर करतात. मात्र, त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. एका जुन्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी ‘शोले‘ सिनेमाचा किस्सा सांगितला होता. मात्र, त्यावरून सचिन यांना ट्रोल करण्यात आलेलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत सचिन यांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.

सचिन पिळगांवकर यांचं सडेतोड उत्तर

सचिन पिळगांवकर म्हणाले की, ‘ट्रोलिंग ना! अहो रस्त्यावर कुत्रे असतात. त्यांना काही लोक खायला घालतात त्यांनाही ट्रोल केलं जातं. लोक कुत्र्यांना आपल्या घरातलं खायला घालण्यासाठी घरात पदार्थ तयार करतात. ही एक संवेदनशील गोष्ट आहे. त्यांनाही ट्रोल केलं जातं. तर मी कोण?’

‘मला ट्रोलिंगचा काही त्रास होत नाही. मी त्यावर बोललो नाही, कारण माझ्याकडे वेळच नाही. मला काम करण्यात जास्त रस आहे. मी माझ्या कुटुंबाला वेळ देईन. सुप्रिया आणि श्रियाला बाहेर घेऊन जाईन फिरायला त्यावर मी उत्तर कशाला देऊ. मी माझा सोशल मीडिया सांभाळत नाही. मी त्यांना सांगितलं आहे की, कमेंट ऑफचं बटण ऑन करायचं नाही. तिथे कमेंट येऊ देत, ज्यांना बोलावसं वाटतं प्लीज बोलू द्या. ही आपल्या महाराष्ट्राची पोरं आहेत. ती महाराष्ट्राची पोरं आहेत, म्हणजे ती माझीच आहेत. या महाराष्ट्रानं मला खूप काही दिलं आहे. त्याची परतफेड मी करू शकत नाही.’

‘अशा कमेंट करणाऱ्यांपेक्षा प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मी त्यांचा विचार करतो, मी ट्रोलर्सचा विचार करत नाही. शिवाय मला जे ट्रोल करतात त्यापैकी अनेकजण माझ्यावर प्रेम करत नसतील, हे आपण कसं काय म्हणणार? जर माझ्या करिअरच्या ६३ व्या वर्षीही लोकांना इतका महत्त्वाचा वाटत असेन तर आणखी काय हवं?’ असं सचिन यांनी शेवटी सांगितलं. ‘झी २४ तास’च्या ‘टू द पॉईंट‘ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर बोलत होते.

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा