AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Pallavi : सीन शूट करताना… साई पल्लवीनं सीतेच्या भूमिकेबद्दल सांगितलं असं काही की अमिताभ बच्चनही झाले खूश, काय म्हणाली अभिनेत्री?

'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात अभिनेत्री साई पल्लवीने 'रामायण' चित्रपटातील सीता मातेच्या भूमिकेबद्दलचे तिचे विचार मांडले. तिचं उत्तर ऐकून कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चनही खूश झाले. अस नेमकं काय म्हणाली साई पल्लवी जाणून घ्या

Sai Pallavi : सीन शूट करताना... साई पल्लवीनं सीतेच्या भूमिकेबद्दल सांगितलं असं काही की अमिताभ बच्चनही झाले खूश, काय म्हणाली अभिनेत्री?
sai pallavi in kbcImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 9:19 PM
Share

‘रामायण’ या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी सध्या चर्चेत आहे. नुकतीच ती ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने सीता मातेच्या भूमिकेबद्दल बोलताना आपले विचार मांडले. तिचं उत्तर ऐकून कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चनही खूश झाले. अस नेमकं काय म्हणाली साई पल्लवी?

दाक्षिणात्य सिनेमात आपल्या अभिनयाची छाप साई पल्लवीने पाडली आहे. तिच्या साधेपणाचे, तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे लोक फॅन आहेत. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये ती सर्वात लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कोणत्याही मेकअपशिवाय पडद्यावर वावरणे, उत्कृष्ट अभिनय कौशल्य आणि अप्रतिम नृत्य यांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनाला भूरळ घातली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता माता आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपटाचा पहिला भाग दिवाळीत म्हणजेच 5 ऑक्टोबर 2026 ला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त या तिघांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये आपली उपस्थिती लावली. तेव्हाचा हा प्रसंग

अमिताभ बच्चन यांनी कलाकारांना विचारलं की, जेव्हा दिग्दर्शकाने त्यांना त्यांच्या भूमिका सांगितल्या, तेव्हा तुमच्या मनात नेमके काय विचार आले होते? आणि तुम्ही या भूमिकांसाठी कशी तयारी केली. यावर साई पल्लवीने दिलेले उत्तर सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली. साई पल्लवी म्हणाली की, ती जेव्हा एखादी भूमिका साकारते, तेव्हा त्या पात्राला आपण काय देऊ शकतो, याचा विचार करते . असं साई पल्लवीने सांगितले. पण सीता मातेची भूमिका मिळाल्यानंतर तिच्या मनात एक वेगळाच विचार आला ते म्हणजे, ही भूमिका साकारताना आपल्याला काय शिकायला मिळेल, असं साई पल्लवी म्हणाली.

 

साई पल्लवीने पुढे सांगितले की,तिने या पात्रासाठी स्वत:ला पारदर्शक ठेवले. पात्र साकारताना प्रत्येक वेळी मी सीता मातेला प्रार्थना केली, की माझ्याकडून उत्कृष्ट भूमिका साकारून घ्यावी. असे साई पल्लवी म्हणाली. तिच्या या उत्तरामुळे मंचावर टाळ्यांचा कडकडाट झाला. तिच्या या उत्तराने अमिताभ बच्चनही प्रभावित झाले.

दरम्यान ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे ‘कौन बनेगा करोडपती 18’ च्या विशेष भागात सहभागी झाले आहेत. या भागात चित्रपटांतील भूमिकांबरोबरच दिवाळीच्या आठवणींवरही गप्पा रंगणार आहेत. हा विशेष भाग 29 आणि 30 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.

साई पल्लवीने मल्याळम, तमिळ, आणि तेलूगू अशा तिन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फिदा’ ,गार्गी, श्याम सिंघा रॉय आणि अमरण यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे राष्ट्रीय स्तरावर विशेष कौतुकही झाले आहे

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत