लग्नाच्या 14 वर्षानंतर सैफने करीनाच्या बेडरुममधील गुपित केलं उघड, म्हणाला तिच्या बेडरुममधून रात्री…

सैफ अली खान आणि करीन कपूर यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता सैफने करीनासोबतचा बेडरुममधील त्या सवयीबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाला सैफ खान? जाणून घ्या सविस्तर

लग्नाच्या 14 वर्षानंतर सैफने करीनाच्या बेडरुममधील गुपित केलं उघड, म्हणाला तिच्या बेडरुममधून रात्री...
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 16, 2026 | 4:44 PM

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच हे दोघे कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी सैफने करीनाच्या एका सवयीबद्दल मजेशीर खुलासा केला. करीनाला रात्री पायांना तूप लावण्याची सवय असून, त्यामुळे तिच्या बेडरूममध्ये ढाब्यासारखा वास येतो असे सैफने विनोदाने सांगितले. त्याच्या या वक्तव्यामुळे शोमध्ये एकच हशा पिकला.

शोच्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा सैफ आणि करीनाला त्यांच्या ताजेतवाने दिसण्यामागचे रहस्य विचारतो. त्यावर सैफ सांगतो की, सध्या तिच्या घरी तुपाचा भरपूर वापर होतो. करीना यावेळी ‘गोवर्धन घी’ असेही सांगते. यानंतर कपिलला आश्चर्य वाटते आणि तो दोघांना खरोखरच इतके तूप वापरता का, असे विचारतो.

Loading...

यावर सैफ सांगतो की, करीना केवळ तूप खात नाही तर रात्री झोपण्यापूर्वी पायांनाही तूप लावते. त्यावर करीनाने असे केल्याने चांगली झोप लागते असे सांगितले. सैफने याच गोष्टीवर विनोद करत तिच्या बेडरूममध्ये दररोज रात्री ढाब्यासारखा वास येतो असे म्हटले. त्याच्या या वक्तव्याने कपिलसह उपस्थित सर्वजण हसू लागले.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

करीनाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सैफसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. डेटिंगच्या दिवसांपासून ते आतापर्यंतच्या आठवणी या फोटोंमधून पाहायला मिळतात. ‘आणखी एक वर्ष सरले… अजून बरीच वर्षे बाकी आहेत,’ अशा आशयाच्या कॅप्शनसह तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सैफ आणि करीनाने 2012 मध्ये विवाह केला. त्याआधी दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. या जोडप्याला तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुले आहेत.

दोघांच्या आगामी चित्रपटांची चर्चा

कामाच्या आघाडीवर सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चर्चा सुरू आहे. सैफ आगामी ‘हम हिंदुस्तानी’ या चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त आहे. तर करीना कपूर खानच्या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटात करीना विशेष भूमिकेत दिसू शकते अशा चर्चा आहेत. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us