AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sexual harassment : शर्लिन चोप्राकडून लैंगिक शोषणाचा आरोप; साजिद खानच्या अडचणीत पुन्हा वाढ

बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Sajid Khan's troubles escalate again, actress Sherlyn Chopra accuses Sajid Khan of sexual harassment)

Sexual harassment : शर्लिन चोप्राकडून लैंगिक शोषणाचा आरोप; साजिद खानच्या अडचणीत पुन्हा वाढ
VN
VN | Updated on: Jan 19, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलीकडेच जिया खानच्या बहिणीनं साजिद खाननं अभिनेत्रीवर लैंगिक छळा केला असा गंभीर आरोप केला होता. जियाची बहीण करिश्मानं साजिदवर जियाशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तर आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानंही साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शर्लिननं तिच्यावर झालेल्या चुकीच्या आरोपाबद्दल ट्विट केले आहे.

शर्लिननं ट्वीट करत ही माहिती दिली आहे – जेव्हा माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी एप्रिल 2005 मध्ये मी साजिद खानला भेटले तेव्हा त्यानं त्याच्या पॅन्टमधून त्याचा खाजगी भाग काढून मला तो पकडायला सांगितला. मला आठवतंय की मी त्याला सांगितलं होतं की, खाजगी भाग कसा असतो हे मला माहित आहे आणि मी त्याला भेटायचा उद्देश आहे त्याचा खासगी भाग पकडण्याचा नाही.

अभिनेत्री जिया खानच्या जीवनावरील ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्यूमेंट्री नुकतीच यूकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे. बीबीसी 2 वर या माहितीपटाच्या दुसर्‍या पर्वामध्ये जियाची बहीण करिश्मा यांनी दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्रीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. करिश्माच्या म्हणण्यानुसार, तिच्याशी झालेल्या या गैरवर्तनानंतर जिया रडत घरी आली. अभिनेत्रीच्या बहिणीनं असंही सांगितलं की साजिदनं तिचा फायदा घेण्यासाठी खूप प्रयत्न केले.

या डॉक्यूमेंट्रीमध्ये करिश्मानं सांगितलं, “तालीम सुरू होती. जिया स्क्रिप्ट वाचत होती आणि साजिद खाननं तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं. काय करावं हे तिला कळत नव्हतं, चित्रपट अजून सुरू झालेला नाही आणि हे सर्व घडत आहे. ती घरी आली आणि खूप रडली. करिश्मानं पुढे सांगितलं, की जियानं आम्हाला सांगितले की- ‘माझा एक करार आहे आणि जर मी हा चित्रपट सोडला तर ते माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील आणि मला बदनाम करतील. मात्र मी हा चित्रपट केल्यास मला लैंगिक छळ होईल. काहीतरी हरवल्याची परिस्थिती आहे. ”म्हणून जियानं तो चित्रपट केला. 2018 मध्ये सुरू झालेल्या #MeToo मोहिमेदरम्यान साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. ज्यामध्ये सलोनी चोप्रा, अहाना कुमरा, मंदाना करीमी, मॉडेल पॉला आणि एक पत्रकार यांचा समावेश होता. ज्यानंतर साजिद खानला बर्‍याच चित्रपटांमध्ये काम करण्यास बंद करण्यात आले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...