Salman Khan : ट्रोलर्सना सलमानने झाप झाप झापलं, आता प्रसिद्ध गायकाने भाईजानला…

सलमान खानचं वय आणि शरीरयष्टीवरून होणाऱ्या ट्रोलिंगविरोधात आता गायक मीका सिंग बोलला आहे. अभिनेत्रींचे अयोग्य पद्धीतने फोटो काढणाऱ्यांना, त्यांना ट्रोल करणाऱ्यांना 'बिग बॉस 20' मध्ये सलमानने खूप सुनावलं होतं.

Salman Khan : ट्रोलर्सना सलमानने झाप झाप झापलं, आता प्रसिद्ध गायकाने भाईजानला...
| Updated on: Sep 22, 2026 | 9:19 PM

अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) वय आणि त्याचं शरीर यामुळे त्याला गेल्या काही काळापासून ट्रोल करण्यात येत होतं, त्याच्यावर बरीच टीकाही झाली. मात्र ‘बिग बॉस 20’च्या वीकेंड का वारमध्ये सलमानने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत चांगलंच सुनावलं. तसेच अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोल करणाऱ्या लोकांनाही सलमानने फटकारलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक मीका सिंग हा सलमान खानच्या सपोर्टमध्ये उतरला असून वय आणि शरीरावरून होणाऱ्या अपमानासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचं त्याने समर्थन केलं आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये माध्यमांनी आणि कलाकारांनीही संयम बाळगायला हवा, असं मीका सिंगने म्हटलं आहे.

‘बिग बॉस 20’च्या मंचावर हा मुद्दा उपस्थित करत अभिनेत्रींचे चुकीच्या अँगलने फोटो काढणाऱ्या पापाराझींवर सलमानने अलीकडेच टीका केली होती. त्याच्या याच विधानावर आता मीका सिंगने प्रतिक्रिया दिली असून मी नेहमीच सलमान सोबत उभा आहे, असं स्पष्ट केलं.

मिकाचा सलमानला सपोर्ट

“ मी नेहमीच सलमान भाईचे समर्थन केलं आहे. त्याने याबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे आणि मी देखील माध्यमांना अशा प्रकारच्या गोष्टी बंद करण्याचे आवाहन करेन. मात्र, काही कलाकार असेही आहेत, ज्यांना वाटतं की लोकांनी त्यांचे व्हिडिओ बनवावेत किंवा त्यांचे फोटो काढावेत.. त्यामुळे यामध्ये दोन्ही बाजूंची संमती आवश्यक आहे; दोन्ही पक्षांनी यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे” असं मीका सिंग माध्यमांशी बोलताना म्हणाला.

काय म्हणाला होता सलमान खान ?

वय, वजन, रूप-रंग, कौटुंबिक पार्श्वभूमी, करिअरमधील अपयश किंवा मातृत्वाचा अनुभव, यावरून ट्रोल करण्याची लोकांची जी वृत्ती आहे, त्याबद्दल ‘बिग बॉस 20 वीकेंड का वार’ एपिसोड दरम्यान सलमान खानने आवाज उठवला होता. आपत्तीजनक परिस्थितीमध्ये सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करू नका, असा इशारा सलमानने पापाराझींना दिला.

कतरिनाच्या ट्रोलिंगवरही भडकला सलमान खान

त्याने कोणाचंही नाव घेतलं नसलं नव्हतं. आई झाल्यानंतर कतरिना कैफच्या वजनात झालेल्या बदलांवरून जे ट्रोलिंग झालं, त्याला उत्तर म्हणून सलमानने हे विधान केलं आणि चोख प्रत्युत्तर दिलं अशी चर्चा रंगली होती. कारण काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ ही पती विकी कौशलसोबत अंबानींच्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी झाली होती. यावेळी सोशल मीडिया युजर्सनी तिच्या वजनावरून कमेंट करत तिला बरंच ट्रोल केलं होतं. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी कतरिनाच्या समर्थनार्थ पुढे आले, मात्र अभिनेत्रीने ट्रोलिंगवर सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

जॅकेट, कॅप काढून सलमानने व्यक्त केला संताप

स्पर्धकांसोबत ट्रोलिंगच्या मुद्द्यावर चर्चा करताना सलमान खूपच अस्वस्थ दिसला . एका क्षणी तर त्याने आपला कोट काढरला, टोपी जमिनीवर फेकली आणि आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “ अचानक सगळे जण वयाबद्दल बोलू लागले आहेत, ते म्हणतात की कोणी म्हातारा झाला आहे. तुम्हाला एखाद्याला ट्रोल करण्याची गरजच काय आहे ? त्यांच्या वजनासाठी, त्यांच्या दिसण्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या हसण्यासाठी, करिअरमधील अपयशासाठी किंवा आई झाल्याबद्दल का बोलता ? तुम्ही तर फक्त तुमच्या संस्कारांची झलक दाखवताय.” असं त्याने सुनावलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us