Bhagyashree Patwardhan : माझ्यासोबत फ्लर्टिंग…’मैने प्यार किया’च्या सेटवर सलमानची विचित्र वागणूक, भाग्यश्री पटवर्धननं केलेला खुलासा
Bhagyashree Patwardhan : भाग्यश्री पटवर्धननं एका जुन्या मुलाखतीत सलमान खानबद्दल भाष्य केलेलं. तसेच 'मैने प्यार किया' सिनेमाच्या आठवणीही सांगितल्या होत्या.

सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धननं 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया‘ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमानं भाग्यश्रीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीनं बघतात. या सिनेमात भाग्यश्री, सलमान खानसोबत झळकली. भाग्यश्री आणि सलमानची खूप चांगली मैत्री झालेली. एका मुलाखतीत अभिनेत्रीनं सिनेमाच्या सेटवरचे किस्से सांगितले होते.
भाग्यश्री पटवर्धननं सांगितला किस्सा
‘दिल दिवाना‘ या गाण्याचा किस्सा सांगताना भाग्यश्री पटवर्धन म्हणाली की, ”मैने प्यार किया’ चित्रपटातील ‘दिल दिवाना’ हे गाण्याचं शूट सुरू होतं. त्यावेळी मला असं वाटलं की, सलमान माझ्यासोबत फ्लर्ट करतो आहे. पण, नंतर मला त्याच्या मनात असं काहीही नव्हतं हे समजलं. त्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सलमान माझ्या बाजूला येऊन बसला. त्यानंतर तो ‘दिल दिवाना’ हे गाणं गुणगुणत होता. तो सेटवर नेहमीच जेंटलमनसारखा वागायचा. त्याचं वागणं खूपच चांगलं होतं.’
‘त्यादिवशी काय घडतंय ते मला समजलं नाही. सलमान त्याची मर्यादा ओलांडतोय, माझ्यासोबत फ्लर्टिंग करतोय का? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मी जिथे कुठे जात होते त्या ठिकाणी तो मला फॉलो करत माझा पाठलाग करत होता. शिवाय गाणं सुद्धा म्हणत होता. मला वाटलं हे काय होतंय. मग त्यानंतर सलमान माझ्या बाजूला येऊन बसला आणि म्हणाला, मला एक गोष्ट माहिती आहे. त्यावर उत्तर देत मी म्हटलं काय माहिती आहे तुला? तेव्हा त्याने मला सांगितलं की, तू कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस, हे मला माहिती आहे. मी हिमालयला खूप चांगलं ओळखतो. तू त्याला कॉल का नाही करत? असं तो म्हणाला. त्या दिवसानंतर सलमान आणि माझ्यामध्ये चांगली बॉण्डिंग निर्माण झाली.’ असं भाग्यश्री पुढे म्हणाली.
त्या दिवसानंतर आमच्या लग्नाबद्दलही माहिती असलेली पहिली व्यक्ती सलमान खान होती, असंही भाग्यश्रीनं सांगितलं. ‘पिंकविला‘ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री बोलत होती.
