'वायरल गायिका' रानू मंडलला सलमानकडून 55 लाखांचं घर गिफ्ट?

गायक हिमेश रेशमियाने रानूला आपल्या एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली. तसेच अभिनेता सलमान खाननेही रानूला मुंबईत 55 लाखांचे घर दिलं असल्याचं बोललं जात आहे.

'वायरल गायिका' रानू मंडलला सलमानकडून 55 लाखांचं घर गिफ्ट?

मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा है’ गाऊन एका रात्रीत रानू मंडल (Ranu Mondal) यांना प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण जीवन गरिबीत काढल्यानंतर रानू मंडल यांचे जीवन आता पूर्ण बदललं आहे. रानू मंडल (Ranu Mondal) यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी रानूचे कौतुक केले, तर गायक हिमेश रेशमियाने रानूला आपल्या एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली. इतकंच नव्हे तर अभिनेता सलमान खाननेही (Salman Khan) रानूला मुंबईत 55 लाखांचे घर दिलं असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ‘न्यूज 18’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रानूच्या गाण्याने लोकांवर अशी जादू झाली की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एका रात्रीत रानू स्टार बनली आहे. अद्यापही रानूच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर रानूचा ट्रेंडिंगला आहे.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, सलमान खानने रानूला मुंबईत 55 लाखांचे घरही गिफ्ट केलं आहे. तसेच रानूच्या आवाजाने सलमानही प्रभावित झाल्याने दबंग 3 चित्रपटात तिला एक गाणं गाण्याची संधी दिली आहे, अशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

गायक हिमेश रेशमिया यांनी रानूच्या गाण्यावर प्रभावित होऊन त्यांच्यासोबत एक गाणं रेकॉर्ड केले. हे गाणं हिमेशचा नवा चित्रपट ‘हॅपी हार्डी आणि हीर’साठी रेकॉर्ड करण्यात आलं आहे. हिमेशने रानूसोबत रेकॉर्ड केलेल्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रानूच्या व्हायरल व्हिडीओवर जवळपास 25 लाख व्ह्यूज आहेत आणि 48 हजार लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *