अभिनेत्रींचे विचित्र फोटो काढणाऱ्यांवर भडकला सलमान, थेट दिला सल्ला, सर्वांकडून होतंय कौतुक
अभिनेत्रींचे अश्लील फोटो काढणाऱ्यांना बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सुनावलं. थेट अभिनेत्रींना दिला मोठा सल्ला. सर्वजण करत आहेत प्रचंड कौतुक.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या ‘बिग बॉस 20’च्या वीकेंड का वारमुळे चर्चेत आहे. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सलमान खानने अनेक मुद्द्यांवर आपली स्पष्ट मतं मांडली. स्वतःच्या टक्कलपणावरून आणि लूकवरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देण्यासोबतच त्याने महिलांच्या फोटोंबाबत पापाराझींवरही नाराजी व्यक्त केली.
अभिनेत्रींचे अस्वस्थ करणारे फोटो काढणाऱ्यांवर सलमानचा निशाणा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पापाराझींकडून अभिनेत्रींचे फोटो काढण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. काही फोटोग्राफर्स अभिनेत्री गाडीतून उतरताना किंवा गाडीत बसताना अशा पद्धतीने उभे राहतात, ज्यामुळे महिलांचे अस्वस्थ करणारे फोटो कॅमेऱ्यात कैद होतात. या प्रकारावर सलमान खानने चिंता व्यक्त केली.
सलमान खानने साई मांजरेकर, नेहा धूपिया आणि आपली भाची अलिजेह यांचा उल्लेख करत सांगितलं की, त्यांच्यासोबतही अशा घटना घडल्या आहेत.
‘असं काही वाटलं तर एक कानशिलात मारा’
या शोमध्ये बोलताना सलमान खानने महिलांना सल्ला देताना सलमान खान म्हणाला की, ‘मी सर्व मुलींना सांगू इच्छितो की, जेव्हा तुम्हाला असं काही जाणवेल, तेव्हा मागे वळून एक कानशिलात मारा.’
सलमान खानच्या या वक्तव्यामधून महिलांना स्वतःच्या सन्मानासाठी आवाज उठवण्याचा संदेश देण्यात आला. काही महिलांना अशा फोटोंबाबत आक्षेप नसू शकतो पण अनेक अभिनेत्री अशा प्रकारच्या छायाचित्रांना पसंती देत नाहीत असंही सलमान खानने नमूद केलं.
सोहेल खान आणि वरुण धवनच्या ट्रोलिंगवरही भाष्य
सलमान खानने यावेळी त्याचा भाऊ सोहेल खान आणि अभिनेता वरुण धवन यांच्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं. सोहेल खानच्या लूकवरून आणि वरुण धवनच्या स्माइलवरून ट्रोल करणाऱ्यांना सलमान खानने सुनावलं.
सलमान खानच्या या वक्तव्यावर वरुण धवनने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टाळ्या वाजवणाऱ्या इमोजीसह सलमान खानचा व्हिडिओ शेअर केला. वरुण धवन आपल्या वडिलांसोबत ‘बिग बॉस 20’चा हा भाग पाहत असल्याचंही समोर आलं. सध्या सलमान खानच्या या स्पष्ट भूमिकेची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.