AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

59 वर्षांच्या वयातील सलमान खानची अवस्था पाहून चाहते भावनिक; म्हणाले ‘अचानक इतका म्हातारा’

59 वर्षांच्या सलमान खानचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही भावनिक झाले आहेत. काहींनी त्यांच्या बदललेल्या लूकवर चिंता व्यक्त केली आहे.

59 वर्षांच्या वयातील सलमान खानची अवस्था पाहून चाहते भावनिक; म्हणाले 'अचानक इतका म्हातारा'
salman khanImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 11, 2025 | 5:52 PM
Share

बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे चाहत्यांच्या मनात कायम असतात. त्यातील एक म्हणजे बॉलिवूडचा ‘दबंग’ सुपरस्टार सलमान खान. चाहते त्याच्यासाठी आजही वेडे आहेत आणि त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अलिकडेच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाची बरीच चर्चा होती. या चित्रपटात सलमानसोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसली होती. तथापि, काही लोकांनी सलमान आणि रश्मिका यांच्यातील वयाच्या अंतरावरून त्यांना ट्रोल केलं. पण यामुळे सलमानच्या फॅन फॉलोईंगवर फार काही फरक पडला नाही.

सलमान खानचे फोटो पाहून चाहते भावूक

सध्या सलमान खानचे असे काही फोटो समोर आले आहेत जे पाहून त्याचे चाहते भावूक झाले. या फोटोमध्ये सलमानचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना विश्वासच बसत नाही. हे फोटो इंस्टाग्रामवरील इन्स्टंट बॉलिवूड पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सलमानने निळ्या आणि बेज रंगाच्या टी-शर्टसह काळ्या रंगाचा जॅकेट घातलेलं दिसत आहे. त्याच्या डोक्यावर काळी टोपी देखील आहे आणि तो कारमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या या फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या वयाचा स्पष्टपणे अंदाज येत होते. त्याच्या चेहऱ्यावर हलकी पांढरी दाढी देखील दिसत आहे. या लूकमध्ये त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला पाहून चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

सलमानचा बदलले लूक पाहून सोशल मीडियावर लोकांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने रडणाऱ्या इमोजीसह लिहिले आहे, “90 च्या दशकातील सुपरस्टार आता म्हातारा झाला आहे”. दुसऱ्याने लिहिले, ” सलमान अचानक इतका म्हातारा कसा दिसतोय?” तर अजून एकाने म्हटले, “तू कसाही दिसत असलास तरी तू नेहमीच आमचा भाई राहशील.” तर एकाने लिहिले, “तू आमच्यासाठी नेहमीच सदाबहार राहशील.”

सलमान खानची गाणी आणि चित्रपट आजही चाहत्यांसाठी तेवढीच प्रिय आहेत. भाईजान म्हणून त्याच्यावर प्रेम करणारे करोडो चाहते आहेत. त्यामुळे त्याचे वय कितीही झाले तरी चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

Follow Us
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य