Nana Patekar : आमिर, सलमान, शाहरुख खान नानांवर इतकं प्रेम करायचे मग त्यांनी असं करायला नको होतं, नाना पाटेकरांच्या शोकसभेतली घटना

Nana Patekar : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. पण त्यांच्या शोकसभेत असं काही घडलं ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त चर्चा सुरु झाल्या आहे. शोकसभेत शिवाजी साटम, तुकाराम मुंढे यांनी श्रद्धांजली तर वाहिली पण असं काही घडलं ज्यामुळे चर्चांनी जोर धरला आहे.

Nana Patekar : आमिर, सलमान, शाहरुख खान नानांवर इतकं प्रेम करायचे मग त्यांनी असं करायला नको होतं, नाना पाटेकरांच्या शोकसभेतली घटना
अभिनेते नाना पाटेकर
| Updated on: Oct 16, 2026 | 9:09 AM

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी 8 ऑक्टोबर 2026 मध्ये गोव्यातील घरात अखेर श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मुंबई शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत नाना पाटकेर यांच्या कुटुंबियांसोबत काही सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. सर्वांना नानांना श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला ‘आठवणीतले नाना’ असं नाव देण्यात आलं. यावेळी जमलेले सर्व भावूक झाले.

शोक सभेत अभिनेते शिवाजी साटम, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी श्रद्धांजली वाहिली. पण शोकसभेत असं काही झालं ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. नाना पाटेकर यांच्यासाठी शोकसभेचं तर आयोजन करण्यात आलं. पण या शोकसभेत कोणताच बॉलिवूड कलाकार दिसला नाही.

Loading...

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. पण सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारखे अभिनेते शोकसभेत दिसले नाहीत. मराठी सिनेविश्वातील काही सेलिब्रिटी दिसले. पण मोठ्या सेलिब्रिटींचं शोकसभेत न दिसणं अनेकांना खटकलं आहे.

 

नाना पाटेकर यांच्या शोकसभेत डायरेक्टर मेहुल कुमार, अभिनेते शिवाजी साटम, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, अभिनेते अनंत महादेवन, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता केके गोस्वामी, संजय जाधव, रोहिणी हट्टंगणी यांसारख्या सेलिब्रिटींनी शोकसभेत उपस्थित राहत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली…

सांगायचं झालं तर, नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला देखील बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित नव्हते.यावर अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना विचारण्यात आलं. यावर प्रवीण तरडे म्हणालेले, ‘बॉलिवूडचे लोक आले नाहीत म्हणून नानांचं मोठेपण कमी होत नाही. नानांपेक्षा बॉलिवूड मोठं नाहीये. नाना खूप मोठे होते.’, एवढंच नाही तर, प्रवीण तरडे म्हणाले, “नानांच्या अंत्ययात्रेला काही हजार शेतकरी आले होते. त्यांच्या अंगाला घामाचा वास होता, मातीचा वास होता.”

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us