AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात सलमान खान साकारणार ‘ही’ खास भूमिका; 7 नोव्हेंबरपासून चित्रपटाचे शुटींग सुरू

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सलमान खानची एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सलमान खानने यापूर्वीही रितेशच्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे मराठमोळे पात्र आणि या चित्रपटातील त्याची ही खास भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खान साकारणार 'ही' खास भूमिका; 7 नोव्हेंबरपासून चित्रपटाचे शुटींग सुरू
Salman Khan to play Jiva Mahala in Raja Shivaji: Shooting to begin on November 7Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2025 | 1:46 PM
Share

रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चाहते आवर्जून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. यात रितेशच छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातं. पण आता या चित्रपटातील अजून एक पात्र, अजून एक भूमिका चर्चेत आली आहे आणि आता या भूमिकेबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.

चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये सलमान खानची महत्त्वाची भूमिका

कारण रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये सलमान खान महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.हा सुपरस्टार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात विश्वासू आणि शूर योद्ध्यांपैकी एक असलेल्या जीवा महालाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. वृत्तानुसार, सलमान 7 नोव्हेंबर रोजी त्याचा सीन शूट करणार आहे आणि हा चित्रपटातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

सलमानची ही भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक 

सलमान खान जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा तो एक अनोखी जादू निर्माण करतो. आता, तो रितेश देशमुखच्या आगामी चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये त्याच्या शक्तिशाली भूमिकेद्वारे तोच करिष्मा दाखविण्यास सज्ज झाला आहे. तसेच त्याची मराठमोळी वेशभूषा, त्याचे पात्र पाहण्यासाठी चाहचे खरंच उत्सुक आहेत.

चित्रपटात संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत दिसणार?

दरम्यान सलमान खानने याआधीही रितेशच्या मराठी चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात आधीच एक छोटीशी भूमिका साकारली आहे. तसेच वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय…’ या गाण्यातही दिसला होता. आता तो ‘राजा शिवाजी’ चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. अफजल खानचा योद्धा सय्यद बंदाचा सामना करताना जीवा महालाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले होते. या चित्रपटात संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

सलमानच्या पहिल्या लूकची सर्वांनाच प्रतिक्षा

सलमान खानला मराठी भाषा ही उत्तम प्रकारे बोलता येते आणि समजते देखील.त्यामुळे त्याला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचंही त्याने मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा रितेशचे मराठी चित्रपट येतात त्यात सलमानची छोटीशी तरी झलक असतेच असते. त्यामुळे सलमानचा पहिला लूक कधी समोर येतोय याची चाहते नक्कीच वाट पाहत आहेत.

सलमान खानच्या कामाबद्दल

सलमान खानकडे एक जबरदस्त चित्रपट लाइनअप आहे, ज्यामध्ये “बॅटल ऑफ गलवान” चा समावेश आहे. त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाल्यापासून ऑनलाइन बरीच चर्चा आणि प्रेक्षकांची उत्सुकता निर्माण केली आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.