समय रैनाच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंची भीती, हातात तो पदार्थ घेऊन बोलला असं काही.., व्हिडीओ Viral

समय रैनाने तुकाराम मुंढेंच्या नावाचा घेतला आधार, ‘इंडियाज गॉट लेटंट’मध्ये गलावटी कबाबवरून केला भन्नाट विनोद. कार्यक्रमातील व्हिडीओ तुफान व्हायरल.

समय रैनाच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंची भीती, हातात तो पदार्थ घेऊन बोलला असं काही.., व्हिडीओ Viral
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 20, 2026 | 6:53 PM

कॉमेडियन समय रैना सध्या ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नव्या एपिसोडमुळे चर्चेत आहे. 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये समयने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा उल्लेख करत मजेशीर टिप्पणी केली. त्याचा हा विनोद ऐकून कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रेक्षक हसू लागले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये एक स्पर्धक स्टेजवर मॅजिक ट्रिक्स दाखवण्यासाठी आला होता. त्याच्या सादरीकरणाने समय रैना प्रभावित झाला. स्पर्धक स्टेजवरून खाली उतरत असताना समयने त्याला रिकाम्या हाताने जाऊ देणार नसल्याचं सांगितलं.

यानंतर समयने स्पर्धकाला गलावटी कबाब खाण्यासाठी ऑफर केले. कबाब देण्यापूर्वी त्याने स्पर्धकाला तो नॉनव्हेज खातो का, असं विचारलं. त्यावर स्पर्धकाने, ‘तुमच्या हातून तर खाईन,’ असं उत्तर दिलं.

यानंतर गलावटी कबाबचं कौतुक करत समयने तुकाराम मुंढे यांच्या नावाचा उल्लेख केला. तो म्हणाला, ‘हे गलावटी कबाब द हॅबिटेटचे आहेत. खूप चांगले आहेत. आधी खूप खराब होते पण तुकाराम मुंढेंच्या भीतीमुळे असे झाले आहेत.’ समयच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

तुकाराम मुंढे चर्चेत का आले?

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि आरोग्यविषयक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. या कारवायांमुळे FDA आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर समय रैनाने त्यांच्या नावाचा विनोदासाठी वापर केला.

नवाजुद्दीन सिद्दीकीसह अनेक कलाकारांची उपस्थिती

या एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, भुवन बाम, कॉमेडियन कौस्तुभ अग्रवाल आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा पॅनेलमध्ये सहभागी झाले होते. याआधीच्या एपिसोडमध्ये समय रैनाने नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या ‘थामा’ चित्रपटावरून रोस्ट केलं होतं. त्याने नवाजुद्दीनला हा चित्रपट करण्यामागचं कारण वारंवार विचारलं होतं.

कुठे शूट होतो हा शो?

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’चे एपिसोड मुंबईतील ‘द हॅबिटेट’ येथे शूट केले जातात. हे ठिकाण स्टँड-अप कॉमेडी आणि लाइव्ह परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. समयचा मित्र बलराज घई आणि त्याचे वडील ‘द हॅबिटेट’चे मालक असल्याचं सांगितलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us