संजय दत्त मराठीमुळे वादात सापडला, आता म्हणतो 100 टक्के मराठी शिकणारच, शिक्षक ठेवून…थेट बॅकफुटवर आला!

मराठी भाषेवरील वादानंतर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ठाण्यात बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाला संजय दत्त? जाणून घ्या सविस्तर

संजय दत्त मराठीमुळे वादात सापडला, आता म्हणतो 100 टक्के मराठी शिकणारच, शिक्षक ठेवून...थेट बॅकफुटवर आला!
| Updated on: Sep 15, 2026 | 7:38 PM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त काही दिवसांपूर्वी दहीहंडीच्या कार्यक्रमातील मराठी वादामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. यानंतर संजय दत्तने मराठी वादावर माफी देखील मागितली होती. अशातच आता संजय दत्त ठाण्यात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेला असता तिथे त्याने मराठीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यासोबत त्याने ठाण्यावर माझं खूप प्रेम आहे आणि भविष्या ठाण्यात घर घ्यावं लागेल असं देखील विधान केलं आहे.

ठाण्यातील ‘ऑन ठाण्याचा महाराजा’च्या दर्शनासाठी आलेल्या संजय दत्तने ठाण्याशी असलेलं आपलं खास नातं आणि मराठी भाषेबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. यावेळी बोलताना त्याने ठाणे हे आपल्यासाठी केवळ एक शहर नसून घरासारखं असल्याचं सांगितलं. तसेच, ठाण्यातील आपली जुनी नाती आणि गेल्या काही वर्षांत शहरात झालेला विकास याबद्दलही त्याने आठवणींना उजाळा दिला.

‘ठाण्यावरती माझं खूप प्रेम आहे. ठाणे माझं घर आहे. मी लहानपणी ठाण्यामध्ये येत होतो. माझ्या मित्राची ठाण्यात फॅक्टरी होती. त्यामुळे ठाण्याशी माझं जुनं नातं आहे’ असं त्याने सांगितलं.

आमदार रवींद्र फाटक माझे मित्र

ठाण्यातील आमदार रवींद्र फाटक हे आपले मित्र असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. ‘आमदार रवींद्र फाटक माझे मित्र आहेत. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. म्हणून मला असं वाटतंय की मला ठाण्यात घर घ्यावं लागेल’ असं म्हणत त्याने ठाण्यात स्थायिक होण्याची इच्छाही व्यक्त केली.

‘मराठी भाषेवर माझं खूप प्रेम’

मराठी भाषेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही त्याने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. ‘मला माहित होतं तुम्ही मला हे विचारणार. मी राष्ट्रीय भाषा बोलतो. मराठी भाषेवर माझं खूप प्रेम आहे आणि ती शिकण्याचा प्रयत्न करेल’ असं त्याने सांगितलं.

आपलं शिक्षण शिमला येथे झाल्यामुळे तेथील भाषेचा प्रभाव आपल्यावर राहिल्याचंही त्याने स्पष्ट केलं. ‘मी सर्व लहान-थोरांना सांगेल की माझं शिक्षण शिमलामध्ये झालं. शिमल्यामध्ये जी भाषा होती ती आली. महाराष्ट्रामध्ये मी कमी राहिलो’ असं त्याने सांगितलं.

मात्र, भविष्यात मराठी भाषा शिकण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्याने जाहीर केलं. ‘100 टक्के भविष्यात मी शिक्षक ठेवून मराठी भाषा शिकणार’ असं आश्वासन त्याने दिलं. त्यामुळे त्याच्या या वक्तव्याची उपस्थितांमध्येही चर्चा रंगली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us