या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, प्रायव्हेट मेसेज पाहून वीरेंद्र सेहवागही थक्क, म्हणाला- ‘म्हणूनच…’
या प्रसिद्ध अभिनेत्रीला अनेक क्रिकेटर्स करतात प्रायव्हेट मेसेज. वाचून वीरेंद्र सेहवाग देखील झाला थक्क. थेट म्हणाला म्हणूनच..., कोण आहे ती अभिनेत्री?

ॲमेझॉन प्राईमचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘राईज अँड फॉल 2’ 26 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता या शोचा प्रीमियर पार पडला. शोच्या पहिल्याच एपिसोडमधील अनेक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये स्पर्धक होस्ट आणि माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत मजेशीर संवाद साधताना दिसत आहेत. याचदरम्यान गायिका आणि अभिनेत्री सारा गुरपाल हिने क्रिकेटर्सबाबत केलेल्या एका खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
‘राईज अँड फॉल 2’ शोमध्ये सारा गुरपालने सांगितले की, काही क्रिकेटर्स तिला सोशल मीडियावर मेसेज म्हणजेच DM करतात. यानंतर वीरेंद्र सेहवागने तिची चांगलीच फिरकी घेतली. साराने काही क्रिकेटर्ससोबतची चॅट सेहवागला दाखवल्यानंतर त्याने आपल्या खास अंदाजात मजेशीर प्रतिक्रिया दिली. या प्रसंगाची क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सारा गुरपालला कोणते क्रिकेटर्स करतात DM?
व्हायरल व्हिडीओमध्ये वीरेंद्र सेहवाग साराला विचारताना दिसतो की, “मी ऐकलं आहे की काही क्रिकेटर्स तुम्हाला DM करतात?” यावर सारा होकार देत काही क्रिकेटर्स तिला मेसेज करत असल्याचे सांगते. त्यानंतर सेहवाग तिचा फोन मागतो. सारा फोनमधील चॅट त्याला दाखवते.
चॅट पाहिल्यानंतर सेहवाग मजेशीर अंदाजात म्हणतो, “अच्छा, यानेही मेसेज केला? म्हणून रन बनत नाहीत!” त्यानंतर तो आणखी गंमतीने म्हणतो की, “यात लेफ्टीही आहे, राईटीही आहे आणि कीपरही आहे.” सेहवागच्या या विनोदी प्रतिक्रियेवर उपस्थितांमध्ये हशा पिकतो. हा संपूर्ण संवाद प्रेक्षकांनाही चांगलाच आवडला असून त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
शोमध्ये एकूण 15 स्पर्धक
दरम्यान, ‘राईज अँड फॉल 2’मध्ये एकूण 15 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये शहबाज पुनावाला, स्वरा भास्कर, गौतम गुलाटी, सारा गुरपाल, करण पटेल, सिवेत तोमर, निहारिका तिवारी, कायरा अनु, प्रियंका चाहर चौधरी, इरिना रुडाकोवा, अनीश भगत, मनीष कश्यप, काजल राघवानी, राज ग्रोवर आणि तेज प्रताप यादव यांचा समावेश आहे.
शो सुरू होताच स्पर्धकांमधील मजेशीर किस्से आणि खुलासे समोर येत असल्याने ‘राईज अँड फॉल 2’ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.