AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Om Puri : मी तीन महिन्यांची गरोदर…ओम पुरी यांंचे विवाहबाह्य संबंध, पत्नीनं सांगितलेला प्रसंग

Om Puri Extra Marital Affair : ओम पुरी यांचे विवाहबाह्य संबंध होते. याबद्दल त्यांची पत्नी सीमा कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.

Om Puri : मी तीन महिन्यांची गरोदर...ओम पुरी यांंचे विवाहबाह्य संबंध, पत्नीनं सांगितलेला प्रसंग
| Updated on: Oct 18, 2026 | 5:18 PM
Share

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूर यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. दुसऱ्या एका स्त्रीमुळे त्यांचं लग्न तुटले. सीमा यांनी सांगितलेलं की, त्यावेळी त्या गरोदर होत्या आणि काही काळानंतर हा विश्वासघात असह्य झाला. त्यांनी घर सोडलं, पण त्यांचं बाळ जगलं नाही. एका मुलाखतीत सीमा यांनी सांगितलेलं की, ओम पुरी यांनी एका मॅनेजरकडे नुकसान भरपाई म्हणून २५,००० रुपये पाठवले होते, पण त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला.

सीमा कपूर यांनी सांगितला प्रसंग

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत सीमा यांनी सांगितलं की, ‘सिटी ऑफ जॉय’ या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ओम यांची नंदिताशी भेट झाली होती. त्या म्हणाल्या, ‘आमच्या लग्नानंतर सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण त्या चित्रपटानं माझं आयुष्य पूर्णपणे उलथवून टाकलं. माझी चांगली मैत्रीण रेणू सलूजा, विधू विनोद चोप्रा यांच्या पहिल्या पत्नीला या अफेअरबद्दल माहीत होतं. त्यांना वाटलं की, चित्रपटानंतर सगळं काही नॉर्मल होईल. मला या अफेअरबद्दल खूप नंतर कळलं, जेव्हा मी दिल्लीत होते. त्यांनी मला फोन करून सांगितलं की, तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे, आणि माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की, तो फक्त प्रसिद्धीसाठी हे करत होता.’

सीमा पुढे म्हणाल्या की, ‘मी मुंबईला परत आले आणि सगळं काही नॉर्मल वाटत होतं. ओम पुरी लवकरच शूटिंगसाठी शहराबाहेर गेले, आणि जेव्हा मी त्यांच्या वस्तू तपासत होते, तेव्हा मला प्रेमपत्रं सापडली. मी पूर्णपणे खचून गेले होते. ते अफेअर करत असूनही मला त्यांना घटस्फोट द्यायचा नव्हता. मला सगळं काही ठीक करायचं होतं. कारण, मी गरोदर होते. मी गरोदर आहे हे त्यांना माहीत होतं. गोष्टी खूपच हाताबाहेर गेल्या होत्या. ते खूप जास्त दारू प्यायचे आणि नंदिता गोंधळ घालायची. एका रात्री, मी घर सोडून जायचं ठरवलं. मी तीन महिन्यांची गरोदर होते.’

सीमा यांचे भाऊ अन्नू कपूर घडलेल्या प्रकारामुळे प्रचंड संतापले होते आणि त्यांनी ओम पुरी यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली. सीमा यांनी ओम पुरी यांच्याकडून पोटगी म्हणून ६ लाख रुपये घेतले, पण जेव्हा सीमा यांनी आपलं बाळ गमावलं, तेव्हा ओम पुरी यांनी पाठवलेले २५,००० रुपये घेण्यास नकार दिला.

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा